खलनायक २ ची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात या सिनेमाच्या स्क्रिप्टवर बरेच काम झाले आहे. निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई आणि मूळ 'खलनायक'चा नायक संजय दत्त या दोघांनाही मूळ सिनेमाचा दुसरा भाग बनवायची इच्छा होती. त्यानुसार स्क्रिप्ट केली गेली आणि त्यामध्ये दोघांनीही आपापल्या सूचना दिल्या. गमतीची गोष्ट ही की दोन्ही उचवलेल्या सिनेमांमध्ये खूप फरक आहे पण 'खलनायक २' मध्ये टायगर श्रॉफ हिरो असावा यावर सुभाष घई आणि संजय दत्त यांचे एकमत झाले आहे.
टायगर श्रॉफसाठी खलनायक बनण्याची ही पहिलीच वेळ असेल. जॅकी श्रॉफला मात्र आपला मुलगा खलनायक बनवावा असे वाटत नव्हते. मात्र सुभाष घई त्याच्याशी बोलले आणि हिरोचा रोल समजावून सांगितला. मग जॅकी श्रॉफ तयार झाला. 'खलनायक २'मध्ये मूळ 'खलनायक'मधील संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे देखील असतील.
पुढील वर्षी जुलैमध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त टायगर रॅम्बोमुळे चर्चेत आहे. मात्र हा चित्रपट अंडर प्रोडक्शन आहे. त्यामुळे या चित्रपट बनण्यासाठी अजून अवकाश आहे.