Join us

टायगर श्रॉफची बहिणीने बर्थडेच्या दिवशी शेअर केला बिकनीतला फोटो, दिशा पटानीने केली ही कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 12:13 IST

अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने नुकताच वाढदिवस साजरा केला.

अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहेत. ती फोटो आणि व्हिडीओ सातत्याने शेअर करत असते. नुकताच तिने वाढदिवस साजरा केला. ती २८ वर्षांची आहे. तिने वाढदिवसादिवशी कृष्णाने बिकनीतील फोटो शेअर केले आहेत आणि #birthdaysuit सांगितले आहे.

कृष्णा श्रॉफने बिकनीतला फोटो शेअर करत लिहिले की, २८ मला चांगले वाटत आहे. #birthdaysuit. फोटोत तिने फ्लॉवर प्रिंटेड मरून रंगाची बिकनी घातली आहे. हा तिचा मिरर सेल्फी आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिशा पटानीनेदेखील कमेंट केली आहे. तिने कृष्णाच्या फोटोवर लिहिले की, बॉडी. यासोबत तिने फायर इमोजीदेखील टाकली.

कृष्णा आणि दिशामध्ये खूप चांगली बॉण्डिंग आहे. दोघे नेहमी फनी व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत असतात. या व्हिडीओत कृष्णा आणि दिशा मस्ती करताना दिसते आहे. व्हिडीओत कृष्णा म्हणते की, मला फरक पडत नाही की तू मला पसंत करत नाही. माझ्या आईचे माझ्यावर प्रेम आहे. आई, तुला मी आवडते ना? त्यावर दिशा म्हणते की, बाळा, आय लव्ह यू.

कृष्णा श्रॉफ आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचे इबन हायमसोबत ब्रेकअपची खूप चर्चा रंगली होती.

टॅग्स :दिशा पाटनीकृष्णा श्रॉफ