Join us

टाइमपास फेम प्रथमेश परब दिसणार या बॉलिवूडच्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 6:30 AM

प्रथमेश परब एका बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. प्रथमेशच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

ठळक मुद्देअन्य गोष्टींना जरा थोडा वेळ बाजूला ठेवा आणि ‘अन्य’ला पाहा, अशी म्हणायची वेळ आता आली आहे... कारण टाइमपास फेम प्रथमेश परब पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकत आहे. सिम्मी लिखित आणि दिग्दर्शित ‘अन्य’ हा प्रथमेशचा तिसरा बॉलिवूड सिनेमा आहे. पॉलिटीकल-रोमँटिक थ्रिलर असणाऱ्या या सिनेमात प्रथमेश परब एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठीतील दिग्गज अभिनेता अतुल कुलकर्णी मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचसोबत या चित्रपटात रायमा सेन, भूषण प्रधान, गोविंद नामदेव, तेजश्री प्रधान आणि कृतिका देव या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टाइमपास, टाइमपास २, लालबागची राणी अशा अनेक चित्रपटात अभिनेता प्रथमेश परबने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली आहेत. 

प्रथमेशने मराठी प्रमाणेच दृश्यम, खजूर पे अटके यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो आणखी एका बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. प्रथमेशच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अन्य गोष्टींना जरा थोडा वेळ बाजूला ठेवा आणि ‘अन्य’ला पाहा, अशी म्हणायची वेळ आता आली आहे... कारण टाइमपास फेम प्रथमेश परब पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकत आहे. त्याच्या आगामी हिंदी सिनेमाचा म्हणजेच ‘अन्य’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सिम्मी लिखित आणि दिग्दर्शित ‘अन्य’ हा प्रथमेशचा तिसरा बॉलिवूड सिनेमा आहे. पॉलिटीकल-रोमँटिक थ्रिलर असणाऱ्या या सिनेमात प्रथमेश परब एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठीतील दिग्गज अभिनेता अतुल कुलकर्णी मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचसोबत या चित्रपटात रायमा सेन, भूषण प्रधान, गोविंद नामदेव, तेजश्री प्रधान आणि कृतिका देव या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘अन्य’ या सिनेमाच्या टीझरने सर्वाचं लक्ष आकर्षित तर केलेच आहे. पण प्रथमेशच्या डायलॉगबाजीने जास्त लक्ष वेधून घेतलंय. “खाना खा लो वरना गोली खानी पडेगी”, “काम क्या है बता” हे प्रथमेशचे डायलॉग्स त्याच्या चाहत्यांना विशेष आवडतील यात काही शंकाच नाही. खरं तर, कोणतेही पात्रं सहज पण उत्तम साकारून प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवण्यात नेहमीच यशस्वी ठरणारा प्रथमेश त्याच्या या हिंदी सिनेमामुळे चर्चेचा विषय बनणार यात शंका नाही.

‘दृश्यम’, ‘खजूर पे अटके’ नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळणे यावरुन हे नक्की की प्रथमेशच्या अप्रतिम कामाचे कौतुक बॉलिवूडमध्ये पण होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात बॉलिवूडने करणाऱ्या प्रथमेश परबचा ‘अन्य’ सिनेमा मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

टॅग्स :प्रथमेश परबअतुल कुलकर्णीभुषण प्रधान