Join us

ए, तो बघ दगडू! 'टाइमपास' सिनेमाची ११ वर्ष, प्रथमेश म्हणतो- "माझं आयुष्य 360° ने बदलणारी एक संधी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:22 IST

'टाइमपास' सिनेमा प्रदर्शित होऊन आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रथमेशने खास पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

मराठीतील सुपरहिट आणि एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक असलेला सिनेमा म्हणजे 'टाइमपास'. या सिनेमातील दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली होती. अभिनेता प्रथमेश परबने या सिनेमातील दगडूची भूमिका साकारली होती. तर केतकी माटेगावकर प्राजूच्या भूमिकेत होती. 'टाइमपास'मुळे प्रथमेशला केवळ लोकप्रियता मिळाली नाही तर या सिनेमाने त्याला रातोरात स्टार केलं. 'टाइमपास' सिनेमा प्रदर्शित होऊन आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रथमेशने खास पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

'टाइमपास'साठी दगडूची पोस्ट 

"ए, तो बघ दगडू!""दगडू, एक सेल्फी काढू का?""दगडू, आता नवीन कोणता सिनेमा येतोय?"

आज 11 वर्षानंतरही, दगडू लोकांच्या लक्षात आहे. या प्रेमाबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे❤️🙏🏻😍 माझं आयुष्य 360° ने बदलणारी एक संधी, एक व्यक्तिरेखा आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचा झालेला अविभाज्य भाग!❤️

एखादा सिनेमा हिट झाला तरीही हा दगडू मला आठवतो किंवा एखादा सिनेमा फारसा चालला नाही तरीही! सिनेमा हिट झाल्यावर, Timepassच्या वेळचे हाऊसफूलचे borads आठवतात. "आई बाबा आणि साईबाबा शप्पथ" असंच काम करत रहा, असं म्हणत दगडू माझं कौतुक करत असेल हे जाणवतं.

त्याउलट जर एखादा सिनेमा फारसा चालला नाही तर, तू tension नको घेऊस रे, tension ला, "चल ए, हवा आने दे"म्हण आणि पुढे जा, असही म्हणणारा दगडू मला जाणवतो.

Thank you so much @ravijadhavofficial , @meghana_jadhav , @priyadarshanjadhavv @chinarmaheshofficial

३ जानेवारी २०१४ रोजी 'टाइमपास' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. रवी जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. ३३ कोटींची कमाई या सिनेमाने केली होती.  

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेतासेलिब्रिटी