Join us

'टायटॅनिक' फेम अभिनेता लिओनार्डोवर ओढवला जीवघेणा प्रसंग, गर्लफ्रेंडसोबत समुद्रात असताना घडली 'ही' घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:13 IST

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओवर जीवघेणा प्रसंग ओढवला असून त्याच्या जगभरातील चाहत्यांना काळजी वाटली आहे (Leonardo DiCaprio)

'टायटॅनिक' या सुप्रसिद्ध सिनेमात काम केलेला हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओसोबत जीवघेणा प्रसंग ओढवला आहे. लिओनार्डो त्याच्या २६ वर्षीय गर्लफ्रेंड विटोरिया सेरेटीसोबत इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होता. हे दोघं भर समुद्रात बोटीवर मजा करत असताना जेलीफिशने लिओनार्डोला डंख मारल्याने अभिनेता जखमी झालेला दिसला. ही घटना झाल्यावर लिओनार्डोवर तत्काळ उपचार करण्यात आले.

इटलीमध्ये असताना लिओनार्डोसोबत घडली ही दुर्घटना

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुप्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो गर्लफ्रेंड विटोरिया सेरेटीसोबत इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सार्डिनीया येथील समुद्रात दोघेही समुद्रात एका आलिशान बोटीवर मजा करत होते. याचवेळी जेलीफिशने लिओनार्डोला डंख मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गर्लफ्रेंडने लिओनार्डोच्या जखमेवर मलमपट्टी जास्त रक्तस्त्राव होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पुढे व्यवस्थित उपचार करुन लिओनार्डो पुन्हा गर्लफ्रेंडसोबत सुट्टीवर परतला.

लिओनार्डोचा फोटो व्हायरल

जेलीफिशने हा हल्ला केल्यानंतर लिओनार्डो डीकॅप्रिओ आणि त्याची गर्लफ्रेंड विटोरिया सेरेटी यांचे काही फोटो व्हायरल झालेत. या फोटोत अत्यंत विचित्र पद्धतीने लिओनार्डो हसत आहे. तो स्विमींग कपड्यांमध्ये दिसत असून त्याने शरीराचा वरचा भाग निळ्या टॉवेलने झाकला आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याला सावरताना दिसत आहे. लिओनार्डो गर्लफ्रेंडसोबत गेल्या एक महिन्यांपासून इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

टॅग्स :लिओनार्डो डिकैप्रियोहॉलिवूड