Join us  

आज चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांची पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 8:21 AM

चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांची आज पुण्यतिथी आहे. किशोर साहू यांनी वीस चित्रपट दिग्दर्शित केले व सात चित्रपटांची निर्मिती केली.

- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. 22 - जन्म:- २२ नोव्हेंबर १९१५
चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांची आज पुण्यतिथी आहे. हा माणूस दिग्दर्शक म्हणून सिनेमात आला, पण त्यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, वीस चित्रपट दिग्दर्शित केले व सात चित्रपटांची निर्मिती केली. किशोर साहू हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. 'दिल अपना और प्रीत परायी' सोडल्यास त्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट लोकप्रिय बनला नाही. १९४९ मध्ये किशोर साहू यांनी आपल्या चित्रपटाचे नाव 'सावन आया रे' असे ठेवले होते. १९५४ सालचा मयुरपंख हा त्यांनी दिग्दर्शित केलेला एक संगीतमय चित्रपट होता. शंकर जयकिशन यांचे संगीत व शैलेन्द्र-हसरत यांची गीते असलेल्या या चित्रपटात त्याने नायकाची व सुमित्रादेवीने नायिकेची भूमिका केली होती. किशोर साहू यांचे २२ ऑगस्ट १९८० रोजी निधन झाले.
 
सौजन्य : इंटरनेट