Join us

Avengers Endgame काय होणार आयर्न मॅनचा अंत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 12:01 PM

अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचा कथितरित्या अखेरचा चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ लवकरच प्रदर्शित होतोय. हा चित्रपट बनवणाऱ्या मार्वेल स्टुडिओने सध्या जगभर प्रमोशनचा धडाका चालवला आहे. भारतातही याचे जबरदस्त प्रमोशन सुरु आहे. साहजिकच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

ठळक मुद्देअ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम हा मार्वेलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट असणार आहे.

अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचा कथितरित्या अखेरचा चित्रपट ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ लवकरच प्रदर्शित होतोय. हा चित्रपट बनवणाऱ्या मार्वेल स्टुडिओने सध्या जगभर प्रमोशनचा धडाका चालवला आहे. भारतातही याचे जबरदस्त प्रमोशन सुरु आहे. साहजिकच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. काही आठवड्यांपूर्वी मेकर्सनी या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर प्रदर्शित केला. हा टीजर पाहिल्यानंतर ‘अ‍ॅव्हेंजर्स  एंडगेम’मध्ये काय काय असणार, यावरून वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तर या चित्रपटात आयर्न मॅनचा मृत्यू पाहायला मिळणार म्हणून चाहते चिंतीत झाले होते. चाहत्यांचा आवडता टोनी स्टार्क अर्थात आयर्न मॅन या भागात अलविदा म्हणणार, असे संकेत ट्रेलरमध्ये देण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

 

आता मार्वेलच्या वेरिफाईड ट्विटर हँडलवरून आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. या व्हिडीओत आयर्न मॅनचे आत्तापर्यंतचे सर्व अवतार पाहायला मिळतात. पण व्हिडीओसोबतचा मॅसेज आणखी धडकी भरवणारा आहे. होय, ‘प्रत्येक प्रवासाला शेवट असतो,’असा गर्भित संदेश या व्हिडीओसोबत लिहिला गेला आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ या चित्रपटासोबत अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचाही शेवट होणार का? आयर्न मॅनचाही शेवट पाहायला मिळणार का? असे प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर निर्माण झाले आहेत.

‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’हा मार्वेलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट ३ तास २ मिनिटांचा असेल. या चित्रपटात मार्वेल सीरिजच्या २२ चित्रपटांचे सुपरहिरो एकत्र दिसणार आहेत. भारतातही या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा उत्साह बघता ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ हा वर्ल्ड वाईड बॉक्सआॅफिसवर एक इतिहास रचेल, असे मानले जात आहे. चीन व आॅस्ट्रेलियामध्ये येत्या २४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर अमेरिेकेत २५ एप्रिल आणि भारतात २६ एप्रिलला बॉक्सआॅफिसवर झळकणार आहे.

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेम