Join us

‘दर्शकांना टीव्हीवर निवडण्यासाठी बरेच काही’

By admin | Published: November 16, 2016 3:42 AM

घरात बायको जेव्हा नवऱ्याला आवाज देत ‘अहो ऐकलंत का?’ असं म्हणते, तेव्हा नवरा कोणत्या ना कोणत्या कारणाने पळवाटा शोधताना दिसतो.

घरात बायको जेव्हा नवऱ्याला आवाज देत ‘अहो ऐकलंत का?’ असं म्हणते, तेव्हा नवरा कोणत्या ना कोणत्या कारणाने पळवाटा शोधताना दिसतो. पती-पत्नींच्या याच हलक्याफुलक्या भांडणाचा आधार घेत एका वाहिनीवर एक मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत पती-पत्नी एकमेकांची पोल खोल करताना दिसणार आहेत. या रिअ‍ॅलिटी शोचे संचालन प्रणोती प्रधान करणार आहे. लग्न झालेल्या जोडप्यांना ती बोलते करेल. त्याच्यासोबत काही खेळही खेळणार आहे. या शोच्या निमित्ताने प्रणोतीने सीएनएक्सशी संवाद साधला. टीव्हीवर बदलत्या स्वरूपासोबतच आपल्या खासगी आयुष्यावरही ती बोलली. ल्ल पश्चिमेकडील देशांच्या तुलनेत आपल्या देशात लग्नं ही बरीच वर्षे टिकतात. दोघांमधील कोणते बंधन एकमेकांना बांधून ठेवत असेल?ल्ल आपल्याकडील संस्कृती अशी आहे, की आपल्याला लहानपणापासून लग्ने निभवायची असतात, असे सांगितले जाते. हे एका दृष्टीने चांगले आहे. आपण एकमेकांना जाणून घेतो. त्यांच्यासोबत राहतो, सुख-दु:खे ही दोन्ही समान अनुभवतो. अनेकांना आपण लिव्ह-इनमध्ये राहावे, असे वाटते. पाश्चिमात्य देशांतसुद्धा आता लग्ने दीर्घ काळ टिकावीत, असे वाटू लागलेय. हा आपल्या लग्नसंस्थेवर दाखविला जाणारा विश्वास आहे. ल्ल काही लोकांचे एक्स्ट्रॉ मारिटल अफेअर असते. ते, ते कसे सांभाळत असतील, याचा उलगडा तुमच्या आगामी शोमधून होणार आहे का?ल्ल आम्ही आमच्या शोमध्ये सर्वसामान्य कपल्सना बोलाविणार आहोत. हा हलकाफुलका नॉन फिक्शन शो आहे. यात एक्स्ट्रा मारिटल अफेअर असलेल्या लोकांना एंट्री नाही. आम्हाला कॉन्ट्रोव्हर्सी नको आहे. आपल्या खासगी आयुष्याविषयी कुणीच बोलणार नाही, असे मला वाटते. लोक आपली एक्स्ट्रॉ मारिटल अफेअर कसे सांभाळतात, हे सांगणे मलाही कठीण आहे. माझे तर लग्नही झालेले नाही. ल्ल टीव्हीवर बरेच बदल होत आहे हे बदल तुला कसे वाटतात? ल्ल मनोरंजनाचे साधन कोणतेही असो बदल हा गरजेचाच आहे. टीव्हीवर होणारे बदल पाहता असे वाटते, की आपण पुन्हा मागे जात आहोत का? पण ट्रेंड तसाच असतो. जुन्या गोष्टी नव्या रूपात येतात. काही गोष्टी जुन्या आहेत, तर काही नवीन. काही नवीन प्रयोगही केले जात आहेत. सध्या टीव्हीवर सर्वांसाठी शो आहेत, असे मला वाटते. नवीन गोष्टींचे स्वागत केले जाते. मला वाटते, भारतीय टीव्ही एक झेप घेत आहे. दर्शकांना निवडण्यासारखे बरेच काही आहे. हे खरोखरच खूप चांगले आहे. ल्ल आज पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. आपापल्या कामाचा ताण सांभाळून, लग्न सांभाळून ठेवणे कठीण नाही का?ल्ल एकमेकांना सांभाळणे यालाच तर आपण सर्व जण प्रेम म्हणतो, पती-पत्नी कबूल करीत नसले तरी ते दोघांत असतेच. पती-पत्नींना एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त करायला वेळ मिळत नाही. पण, प्रेम हे दोघांमध्ये असते म्हणूनच दोघेही सोबत राहू शकतात. हे किती कठीण आहे, हेच आम्ही आमच्या शो ‘अजी सुनते हो’मधून दाखविणार आहोत.तू लग्न करण्याच्या विचारात आहेस का? कुणी जोडीदार शोधलाय का? सध्या मी सिंगल आहे; पण माहिती नाही कसे करणार? पण मी लग्नाचा तो लाडू खाणारच आहे. एखादा चांगला जोडीदार मिळाला, की मी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करेन. लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज, मला लग्न करायचेच आहे. सध्या तरी मी कुणाच्या शोधात आहे, असेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही प्रोजेक्टवर काम करीत आहेस का? सध्या तरी नाही. आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार प्रसारित होणार असल्याने सध्या त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी १०० टक्के प्रयत्न करणार आहे.