Join us

चित्रपटांनीही कॅश केला गुप्तहेराचा विषय

By admin | Published: April 06, 2016 1:44 AM

नुकतेच पाकिस्तानने एका भारतीय नागरिकाला अटक केली आणि दावा केला की तो भारतीय गुप्तचर संघटना रॉ साठी गुप्तहेराचे काम करीत होता.

नुकतेच पाकिस्तानने एका भारतीय नागरिकाला अटक केली आणि दावा केला की तो भारतीय गुप्तचर संघटना रॉ साठी गुप्तहेराचे काम करीत होता. भारत सरकार कडून मात्र या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे. हा एक योगायोग आहे की, एकीकडे पाकिस्तानमध्ये गुप्तहेराच्या आरोपाखाली एका भारतीय नागरिकाला अटक झाली आणि येथे सरबजीतच्या जीवनावर चित्रपट बनत आहे. पंजाबात राहणाऱ्या सरबजीत सिंहला पाकिस्तानात गुप्तहेरी करण्याच्या आरोपावरून पकडले होते आणि त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अखेर लाहोरच्या जेलमध्ये कैद्यांनी सरबजीत सिंहची हत्या केली. ‘मेरी काम’चे दिग्दर्शक ओमांग कुमार सध्या ऐश्वर्या रॉय आणि रणदीप हुड्डाला घेऊन हा चित्रपट बनवित आहेत, ज्यात सरबजीत सिंहच्या भूमिकेत रणदीप हुड्डा आणि त्याच्या बहिणीच्या भूमिकेत ऐश्वर्या रॉय काम करीत आहे. दलजीत कौरने आपल्या भावाच्या सुटकेसाठी खूप मेहनत केली होती, मात्र प्रयत्नांना यश नाही आले. शेजारी देशाच्या गुप्तहेरीच्या प्रकरणावरून पहिल्यांदाच राज कपूरने ‘हिना’ बनविला होता, ज्यात ऋषी कपूर नदीत वाहून पाकिस्तानात पोहचतो आणि आपली स्मृती गमावून बसतो. पाकिस्तान पोलिस अधिकारी त्याला भारतीय गुप्तहेर समजतात आणि भारताच्या सीमेकडे परत येताना तो फायरिंगमध्ये हिना (जेबा) ला गमावून बसतो. अनिल शर्माच्या ‘गदर’मध्ये आपल्या पत्नीला वापस आणण्यासाठी सनी देओल सीमा पार करून पाकिस्तान पोहचतो, तर त्यालादेखील गुप्तहेर समजण्यात येते. मात्र पाक सेनेला चोख उत्तर देऊन सनी आपल्या पत्नीला परत आणण्यात यशस्वी होतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फिल्मिस्तान’मध्ये हिंदी चित्रपटाचा एक चाहता चुकून सीमा पार करतो आणि तिथेच अटकतो. तेथील हिंदी चित्रपटाच्या एका चाहत्यामुळे कसातरी घरी परत येतो. ‘बजरंगी भाईजान’मध्येही अशीच काहीसी कथा होती. ज्यात मुन्नीला तिच्या घरी सोडण्यासाठी बजरंग भक्त पवन पाकमध्ये पोहचतो आणि त्यालादेखील गुप्तहेर समजले जाते.