स्वत:चे घर असावे, असे स्वप्न अनेकांकडून पाहिले जाते. वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून, अपार कष्ट करून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली जाते. मुंबईसारख्या शहरात आपला हक्काचा आशियाना मिळवण्यासाठी एका कुटुंबाने केलेली धडपड शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडली आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. वास्तव परिस्थितीची सर्वसामान्यांच्या स्वप्नांशी सांगड घालत एका चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची कथा ‘ट्रकभर स्वप्नं’या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कुटुंबासोबत प्रेक्षकांनी बघावा असा हा सिनेमा आहे. कुटुंब एकत्र राहिलं की, ते कोणत्याही वादळाला सामोरं जाऊ शकतात. अशी अगदी मध्यमवर्गीयांची गोष्ट उलगडणारा हा चित्रपट आहे. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात दाखवतानाच प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या स्वप्नांना आशेचे पंख जोडणारा चित्रपट असल्याचा विश्वास यातील कलाकारांनी व्यक्त केला आहे. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असून मकरंदने यांनी या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. या दोघांसोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत ४ सुरेख गाण्यांचा सुरेख नजराणा ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात दिसणार आहेत. श्रेयस यांच्या लेखणी व संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम, आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. छायांकन राजीव जैन यांनी केले असून संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर रंगभूषा सुहास गवते यांची आहे. ध्वनी विजय भोपे यांचे आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली आहे. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
‘ट्रकभर स्वप्नं’ लवकरच चित्रपटगृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:21 AM
मुंबईसारख्या शहरात आपला हक्काचा आशियाना मिळवण्यासाठी एका कुटुंबाने केलेली धडपड शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडली आहे.
ठळक मुद्दे४ सुरेख गाण्यांचा सुरेख नजराणा ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात दिसणार आहेतस्वप्नांची कथा ‘ट्रकभर स्वप्नं’या चित्रपटातून मांडण्यात आली आहे