अभिनेत्री तृप्ती खामकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गिरगीट'मध्ये माहीच्या भूमिकेत झळकली. यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती झोंबिवली या मराठी चित्रपटात दिसणार आहे.
झोंबिवली या चित्रपटात तृप्ती खामकरने मालतीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा खूप हटके आहे. या भूमिकेबद्दल तृप्ती सांगते की, “मी जास्त काही उघड करू शकत नाही पण हे एक अतिशय गोड पात्र आहे. जे तुम्ही मला अनेकदा साकारताना पाहिले असेल. पण मी ही भूमिका निवडली कारण ती व्यक्तिरेखा स्वतःच खूप शक्तिशाली आहे. ती महिला सक्षमीकरणाची हाक देते, ती स्वतःसाठीच आहे. ज्याचा विचार आपल्या समाजातील महिलांसाठी खूप गरजेचा आहे.”
हॉरर-कॉमेडी प्रवास मिळणार अनुभवायला झोंबिवली या चित्रपटात हॉरर-कॉमेडी प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. या चित्रपटात तृप्ती खामकर, अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.