Join us

रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 3:27 PM

'तू झुठी मै मक्कार' हा सिनेमा आजच रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. या फ्रेश जोडीचा 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhuthi Mai Makkar) हा सिनेमा आजच रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. 

'तू झुठी मै मक्कार' सिनेमा आज रिलीज झाल्यानंतर समीक्षकांनीही खूप कौतुक केले आहे. फिल्मचे अॅडव्हान्स बुकिंग ओपन झाल्यानंतरच समजले होते की सिनेमा चांगला बिझनेस करेल. आता रिलीजसोबतच कमाईचे आकडेही समोर आले आहेत. 

फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाच्या कमाईचे आकडे मांडले आहेत. त्यांच्या विश्लेषणानुसार, बुधवारी ओपनिंग डे लाच फिल्मने दुपारी ३ पर्यंत 3.78 कोटींची कमाई केली. हे आकडे नॅशनल चेन्सचे आहेत. पीव्हीआरमध्ये 1.82कोटी रुपये, आयनॉक्स 1.20 रुपये आणि सिनेपोलिसमध्ये 76 लाख रुपयांचा गल्ला जमला आहे.

फिल्मचे हे आकडे केवळ ३ चेन्सचे आहेत. तसंच हा सकाळपर्यंतचा आकडा आहे. फिल्मला बंपर ओपनिंग मिळत आहे. होळीच्या सुट्टयांच्या मुहुर्तावर फिल्म रिलीज झाल्याने फायदा मिळू शकतो. 

क्या बात है! चाहत्याचे श्रद्धासोबत ठुमके, 'शो मी द ठुमका' गाण्यावर डान्स Video व्हायरल

'तू झुठी मै मक्कार' सिनेमा लव्ह रंजन यांनी दिग्दर्शित केला आहे. याआधी त्यांनी 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' या रोमॅंटिक कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यावेळी त्यांनी रणबीर आणि श्रद्धाची फ्रेश जोडी आणली आहे जी चाहत्यांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरत आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूररणबीर कपूरसिनेमा