Join us

"अत्याचाराच्या घटना ऐकुन त्रास होतो..." मास्तरीण बाईंची बाप्पाकडे तक्रार; मन मोकळं करत म्हणते.., 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 3:23 PM

सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे आज आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे.

Shivani Rangole Video : सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे आज आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. घरगुती उत्सवांसह कलाकार मंडळांनी सजविलेल्या दरबारात बाप्पा विराजमान होणार असल्याने 'गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष करीत बाप्पांचे आज सगळीकडे आगमन झाले. सर्वसमान्यांपासून कलाकार मंडळीही बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच अभिनेत्री शिवानी रांगोळेचासोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने गणरायाकडे तक्रार केली आहे. 

लाडक्या बाप्पासोबत फोनवरून संवाद साधत मास्तरीण बाईंनी गणपतीला साकडं घातलं आहे. नुकताच झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर अभिनेत्री शिवानी रांगोळेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी सोफ्यावर बसलेली असताना तिला बाप्पाचा फोन येतो तेव्हा ती म्हणते, "सुरुवातीला अभिनेत्री बाप्पाची विचारपूस करत म्हणते, हॅलो बाप्पा कसा आहेस तू? ऐरवी खरंतर तू आम्हाला विचारतोस, कशी आहेस, कसा आहेस? पण आज मी तुला विचारते तू कसा आहेस? तुझ्या उत्सावाची तयारी आम्ही जोरदार करत आहोत आणि तुझ्या आगमनाची अगदी आतुरतेने वाट बघतोय. यावेळी खूप लोक तुझ्याकडे खूप काही मागत असतील मलाही तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. पण, मी माझ्यासाठी काही मागणार नाही आहे, किंवा मी कुठलीही वस्तू मागणार नाही. मला तुझ्याबरोबर काहीतरी शेअर करायचं आहे. गेले काही वर्तमानपत्र उघलडं सोशल मीडिया उघडलं की खूप बातम्या दिसतात. ज्यामध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल कळतं".

पुढे अभिनेत्री म्हणते, शाळेत चिमुकल्या मुलींवर होणाऱ्या अत्याचारबद्दल कळतं आणि वर्तमानपत्र अशा बातम्यांनी भरून गेलेलं असतं. हे सगळं बघून प्रचंड त्रास होतो. शाळेसारखी जागा जर सुरक्षित नसेल तर मुलींना कुठे सुरक्षित वाटणार? यासाठी मला तुला असं मागायचं आहे की, मुलांआधी पालकांना शिक्षण दे. आपल्या मुलांना कसं वाढवायचं याचं शिक्षण दे बुद्धी दे. मुलींनी कसं वागावं? कसं बोलावं? कसे कपडे घालावे? यापेक्षा मुलांची नजर कशी असावी? आपण आपल्या मुलाला कसे वाढवत आहोत. मुलीने घरात सातच्या आत यायला पाहिजे यापेक्षा आपला मुलगा संध्याकाळी सात नंतर काय करतो? तो कुठे असतो? त्याची संगत काय आहे, या गोष्टींचा पालकांनी विचार करावा अशी त्यांना बुद्धी दे आणि मुलींना सगळ्यांना सुरक्षित वाटेल अशा वातावरणाची निर्मिती होऊदेत". असं साकडं अभिनेत्रीने बाप्पाकडे घातलं आहे.

मागील काही दिवसांमध्ये देशात लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटना चिंतेत भर घालणाऱ्या आहेत. यानिमित्ताने गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथील निवासी डॉक्टरला अमानवी अत्याचाराला सामोरे जावे लागेल. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर बदलापूर येथे बालवाडीत शिकणाऱ्या लहान चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. 

टॅग्स :शिवानी रांगोळेटिव्ही कलाकारबदलापूरगणेश चतुर्थी २०२४सोशल मीडिया