Join us

बॉलिवूडला रामराम करून ही अभिनेत्री सांभाळतेय नवऱ्याचा बिझनेस, तिला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 15:30 IST

पहिल्याच चित्रपटातून लोकप्रिय झाली होती ही बॉलिवूडची अभिनेत्री

२००२ साली प्रदर्शित झालेल्या 'मेरे यार की शादी है' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ट्युलिप जोशी तुम्हाला आठवत असेल ना. ट्युलिपने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र ट्युलिपनं बॉलिवूडला राम राम केला असून आता ती तिच्या नवऱ्याचा बिझनेस सांभाळते आहे.' मेरे यार की शादी है ' या चित्रपटात काम करण्याची संधी ट्युलिपला योगायोगानं मिळाली होती.

खरंतर चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा त्याच्या मित्राच्या लग्नात गेले होते. तिथे त्याने ट्युलिपला पाहिलं होतं. तिथेच त्याने ट्युलिपला मेरे यार की शादी हैसाठी ऑडिशन देण्याची ऑफर केली. त्यावेळी ट्युलिपला हिंदी तितकं नीट येत नव्हते. त्यानंतर तिने हिंदी धडे गिरविले आणि चित्रपटात काम केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर ट्युलिपकडे बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. त्यातील एक चित्रपट होता मातृभूमि. हा चित्रपट स्त्री भ्रूण हत्यावर आधारीत होता. या चित्रपटात ट्युलिपने कल्कीची भूमिका साकारली होती. जी पाच भावांसोबत लग्न करते आणि तिला आठवड्यातील रात्र वेगवेगळ्या भावांसोबत व्यतित करायची असते. या चित्रपाटाला घेऊन खूप वाद झाले होते. या चित्रपटाचा विषय खूप चांगला होता. पण, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

याच दरम्यान ट्युलिपला कॅप्टन विनोद नायरवर प्रेम जडलं. विनोद प्रसिद्ध कादंबरीकार 'प्राइड ऑफ लॉयन्स'चे लेखक असून तो यशस्वी बिझनेसमॅनदेखील आहे.

विनोद १९८९ पासून १९९५ पर्यंत भारतीय लष्करात होते.दोघे जवळपास ४ वर्षे लिव इन रिलेशीपमध्ये राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर ट्युलिप नवरा विनोद नायरसोबत त्यांचा कोटीचा बिझनेस सांभाळते आहे.

ती कंपनीची डिरेक्टर आहे.

टॅग्स :बॉलिवूडजिमी शेरगिल