सिनेसृष्टीतील सध्याची मुख्य गायिकांची नावं घ्यायची तर श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, मोनाली ठाकूर, नीति मोहन, पलक मु्च्छल अशा काही गायिकांची नावं येतात. भारतीय गायकही श्रीमंतीच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर असतात. भारतातील सर्वात श्रीमंत गायिकेकडे २०० कोटी नेटवर्थ आहे. मात्र तिचा समावेश इंडस्ट्रीतील टॉप गायिकांमध्ये नाही. कोण आहे ही गायिका?
देशातील सध्याची सर्वात टॉपची गायिका म्हटलं तर अनेक जण श्रेया घोषालचं नाव घेतील. मात्र श्रेयापेक्षाही जास्त नेटवर्थ असणारी आहे गायिका आहे ती म्हणजे तुलसी कुमार (Tulsi Kumar). टी सीरिजचे गुलशन कुमार यांची ती मुलगी आहे आणि भूषण कुमारची बहीण आहे. तिची एकूण नेटवर्थ २१० कोटी इतकी आहे. याचा अर्थ ती सर्व गायक-गायिकांमध्येच नाही तर काही कलाकारांहूनही श्रीमंत आहे. तुलसीचा फॅमिली बिझनेसमध्ये मोठा वाटा आहे. ती टी-सीरिज युट्यूब चॅनल किड्स हटची मालकीण आहे. यामध्ये लहान मुलांसाठी कंटेंट, नर्सरी कविता आणि गोष्टी असतात.
तुलसी कुमारने 'भूल भुलैय्या', 'आशिकी २', 'रेडी', 'दबंग', 'कबीर सिंह', 'सत्यप्रेम की कथा' सारख्या सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत गायिकांच्या यादीत तुलसीनंतर श्रेया घोषालचं नाव येतं. श्रेयाची एकूण नेटवर्थ १८० ते १८५ कोटी आहे. सुनिधी चौहान तिसऱ्या स्थानावर आहे. तिची नेटवर्थ १००-११० कोटी इतकी आहे.