'तुंबाड' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. २०१८ साली आलेला 'तुंबाड'ने सर्वांना घाबरवून सोडलं. आजही भयपट म्हटलं की 'तुंबाड' आठवतो. मराठमोळा दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी 'तुंबाड'चं दिग्दर्शन केलं. 'तुंबाड' नंतर राही अनिल बर्वेच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. आता प्रतिक्षा संपली आहे. 'तुंबाड' नंतर राहीच्या आगामी सिनेमाबद्दल माहिती त्याची बहिण अन् मराठमोळी नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरने दिली आहे.
'तुंबाड'नंतर राही प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर 'गुलकंद टेल्स' ही नवी वेबसिरीज आणत आहेत. १९ मार्चला मुंबईत या सिरीजची घोषणा करण्यात आली. याविषयी फुलवा खामकर लिहीतात, "अखेर गुलकंद टेल्स लवकरच भेटीला. माझा भाऊ राही अनिल बर्वे लेखन - दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना पुन्हा एकदा. मला खुप आनंद होत आहे गुलकंद टेल्सची घोषणा करताना.."
फुलवा खामकर पुढे लिहीतात, "तुंबाडनंतर प्रत्येक जण राहीच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत होतं. गुलकंदच्या भूमीवर आधारीत एक वैशिष्ट्यपूर्ण कहाणी तुम्हाला गुलकंद टेल्स मधून बघायला मिळेल. राज आणि डीके राहीवर विश्वास ठेवला त्यासाठी धन्यवाद." अशाप्रकारे 'तुंबाड'नंतर राहीचा नवीन प्रोजेक्ट अन् ते सुद्धा वेबसिरीज बघायला सगळे उत्सुक असतील यात शंका नाही. 'फॅमिली फॅन' राज आणि डीके यावेळी निर्माते म्हणून राहीला साथ देत असल्याची शक्यता आहे.