Tunisha Sharma : 'तुनिशापासून दूर राहा', सेटवर येऊन आईने एक दिवस आधीच दिली होती ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 04:00 PM2022-12-28T16:00:28+5:302022-12-28T16:01:45+5:30

आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिशाची आई सेटवर आली होती. तेव्हा तिने शिझानसोबत चर्चा केली होती. 

tunisha-mother-gave-ultimatum-to-shizaan-to-stay-away-from-her-daughter-one-day-before-tunisha-suicide | Tunisha Sharma : 'तुनिशापासून दूर राहा', सेटवर येऊन आईने एक दिवस आधीच दिली होती ताकीद

Tunisha Sharma : 'तुनिशापासून दूर राहा', सेटवर येऊन आईने एक दिवस आधीच दिली होती ताकीद

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. काही तासांपूर्वी सीनसाठी तयार होत असतानाचा व्हिडिओ तुनिषाने  सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मग असे काय झाले की तिने इतके टोकाचे पाऊल उचलले? तुनिषाच्या आईने अभिनेता शिझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे. आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिशाची आई सेटवर आली होती. तेव्हा तिने शिझानसोबत चर्चा केली होती. 

तुनिशापासून दूर राहा...

तुनिशाच्या आईने अभिनेता शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझानमुळेच मुलगी तुनिशाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. तर तुनिशाने आत्महत्या केली त्याच्या एक दिवस आधीच तुनिशाची आई मालिकेच्या सेटवर आली होती. त्यांनी शिझान खानसोबत बराच वेळ चर्चा केली. तसंच तुनिशापासून दूर राहा असंही त्यांनी शिजानला ठणकावून सांगितलं.

Tunisha Sharma: शिजान खानसोबत असं होतं तुनिशा शर्माचं नातं, त्याच्यासाठी वेळोवेळी लिहायची अशा पोस्ट

पोलिसांचा तपास सुरु

तुनिशाने ३ वाजता सेटवरच शिजानसोबत जेवण केले आणि ३.१५ वाजता तिने आत्महत्या केली. मग मध्ये १५ मिनिटे नेमके काय घडले की तुनिशाने एवढे टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलिस करत आहेत. शिझानची पोलिस कोठडी आज संपत आहे मात्र अधिक तपासासाठी त्याच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Web Title: tunisha-mother-gave-ultimatum-to-shizaan-to-stay-away-from-her-daughter-one-day-before-tunisha-suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.