तुनिषानं वाचले शीजानचे WhatsApp चॅट्स अन् धक्काच बसला, इथंच सारं बिनसलं; वाचा पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:48 PM2022-12-26T14:48:04+5:302022-12-26T14:49:24+5:30

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणामुळे टेलिव्हिजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

tunisha sharma caught sheezan khan of cheating on her fully shattered leads breakup suicide case | तुनिषानं वाचले शीजानचे WhatsApp चॅट्स अन् धक्काच बसला, इथंच सारं बिनसलं; वाचा पुढे काय घडलं?

तुनिषानं वाचले शीजानचे WhatsApp चॅट्स अन् धक्काच बसला, इथंच सारं बिनसलं; वाचा पुढे काय घडलं?

googlenewsNext

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणामुळे टेलिव्हिजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईनं आता धक्कादायक खुलासे केले आहेत. तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा बॉयफ्रेंड शीजान खान याच्यावर तुनिषाच्या आईनं धक्कादायक आरोप केले आहेत. शीजान धोकेबाज निघाला आणि त्यानं माझ्या मुलीचं आयुष्याचं वाटोळं केलं असा आरोप तुनिषाच्या आईनं केला आहे. 

लग्नासाठी तुनिषाचं धर्मांतर करण्याचा होता शिजानचा इरादा? पोलीस करणार तपास!

तुनिषासोबत प्रेमसंबंध असतानाही शीजन खान याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. याची माहिती तुनिषाला मिळाली होती आणि याचमुळे ती डिप्रेशनमध्ये होती असा दावा तुनिषाच्या आईनं केला आहे. याच महिन्यात सेटवर सहजच तुनिषानं शीजानचा मोबाइल तपासला होता. यात शीजानचे एका महिलेसोबत डेटिंग संदर्भातील चॅट्स तुनिषाला आढळले. शीजानचे चॅट्स वाचून तुनिषा खूप दु:खी आणि तणावात होती. तुनिषानं शीजानला याचा जाबही विचारला होता, अशी माहिती तुनिषाच्या आईनं दिली आहे. 

आत्महत्याच्या एक दिवस आधी तुनिषा शर्माने आईला सांगितली होती तिची अवस्था, म्हणाली मला शिजान.....

शीजानची पोलखोल झाल्यानंतर त्यानं तुनिषाला आता तुझ्यासोबत मला राहायचं नाही असं सांगितलं. शीजानचं हे म्हणणं ऐकून तुनिषाला धक्का बसला होता. ती प्रचंड तणावात होती. यात आपणही शीजान याच्याशी संपर्क केला होता, असं तुनिषाच्या आईनं सांगितलं. 

सेटवर झाली होती दोघांची भेट
तुनिषाच्या आईनं आरोपी शीजान याच्याशी अनेकदा संपर्क साधला होता. आपल्या मुलीला असं फसवायचंच होतं मग तू तिच्या जवळ आलाच कशाला? माझ्या मुलीचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? असा जाब शीजानला विचारला होता, असंही तुनिषाच्या आईनं सांगितलं. तुनिषा आणि शीजान यांची लव्हस्टोरी 'अलिबाबा' या टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर सुरू झाली होती. सहा महिन्यांपूर्वीच दोघं रिलेशनशीपमध्ये होते. तर १५ दिवसांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं. शीजानसोबतचं नातं तुटणं तुनिषाला अजिबात सहन झालं नाही आणि तिनं आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं असं तुनिषाच्या आईचं म्हणणं आहे. 

Web Title: tunisha sharma caught sheezan khan of cheating on her fully shattered leads breakup suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.