Join us

Tunisha Sharma : “अब सदियो की तन्हाई है...”, तुरुंगातून बाहेर आलेल्या शिझानची तुनिशा शर्मासाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 12:02 IST

Tunisha Sharma, Sheezan Khan : तुनिशा शर्माच्या आत्महत्येसाठी तिचा बॉयफ्रेन्ड शिझान खानला जबाबदार धरण्यात आलं होतं. तुनिशाच्या आईच्या तक्रारीवरून शिझानला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शिझान तुरुंगात होता...

'अलीबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेची अभिनेत्री तुनिशा शर्माने (Tunisha Sharma) गतवर्षी डिसेंबर महिन्यात मालिकेच्याच सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येसाठी तिचा सहकलाकार व बॉयफ्रेन्ड शिझान खानला (Sheezan Khan) जबाबदार धरण्यात आलं होतं. तुनिशाच्या आईच्या तक्रारीवरून शिझानला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शिझान तुरुंगात होता. मार्चमध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला. तुरूंगातून बाहेर आल्यावर शिझान तुनिशाच्या आठवणीत व्याकूळ झालेला दिसतोय. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच त्याने तुनिशासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

तुनिशाच्या आत्महत्येच्या दिवशी शिझानने शेवटची पोस्ट केली होती. आता जामिनावर बाहेर आल्यानंतर प्रथमच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याचे व तुनिषाचे अनेक फोटो व क्लीप आहेत. व्हिडीओत दोघंही कमालीचे आनंदी दिसत आहेत. व्हिडीओसोबत शिझानने एक कविता शेअर केली आहे.

एक परी उतरी फलक से शफ़क़ की लाली लिएकहकशा ज़ैसी उसकी आँखें ग़ज़ब की अदाएं लिए,खुदको देखा भी नहीं खुदको पहचाना भी नहींतकब्बुर होता हैं क्या यह उसने जाना ही नहींहवा की तरहा आयी वोह पर हवा कही ठहरती नहीं.क्या तूफ़ान थे उसने सीने में दबाए यह बात वोह किसी से कहती नहींथम गया तूफ़ान अचानक अजब सी खामोशी छायी हैबिखरे कुछ टुकड़ों में हमने सिर्फ़ उदासी पायी हैदिल अचानक से है भारी आँखें भी भर आईं हैउसके हमारे दरमियान अब सदियो की तन्हाई हैशफ़क़ को लाली देके वापिस फलक पे वह यूँ चली गईकहकशा में घर बनाया उसने और वही पर रह गई – शीज़ान ख़ान‘फक्त माझीच तुन्नी’, अशी पोस्ट शिझान खानने शेअर केली आहे.गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तुनिशाने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवशी शिझानला अटक करण्यात आली होती. गेल्या ४ मार्च रोजी शिझान जामिनावर सुटला. 

टॅग्स :तुनिशा शर्माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार