Join us

Tunisha Sharma : शिझानच्या मेकअपरुममध्येच तुनिषाने केली आत्महत्या; कोण आहे शिझान खान ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 8:58 AM

तुनिषाच्या आईने अभिनेता शिझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे. शिझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. 

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. काही तासांपूर्वी सीनसाठी तयार होत असतानाचा व्हिडिओ तुनिषाने  सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मग असे काय झाले की तिने इतके टोकाचे पाऊल उचलले? तुनिषाच्या आईने अभिनेता शिझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे. शिझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. 

शिझान खान कोण आहे ?

शिझान खानचा जन्म मुंबईत ९ सप्टेंबर १९९४ रोजी झाला. शिझान महाराष्ट्रातील मुस्लिम परिवारातला मुलगा. त्याने मुंबई विद्यापिठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो एक मॉडेल आणि अभिनेता आहे. शिझानने खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जोधा अकबर या मालिकेत त्याने अकबरच्या बालपणीची भुमिका साकारली होती. शीजानने तुनिषासोबत 'अली बाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भुमिका केली होती. शिझानच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर तुनिषासोबत अनेक फोटो आहेत. या फोटो, व्हिडिओ वरुन असे वाटते की त्यांच्यात चांगले नाते होते. शिझान फिटनेसबाबतीतही खूप जागरुक आहे. 

Tunisha Sharma: सुसाईड नोट सापडली नाही, दोन्ही बाजूने तपास करणार; घटनास्थळी उपस्थितांचीही चौकशी सुरु

शिझानसाठी तुनिषाची पोस्ट

जागतिक पुरुष दिनानिमित्त तुनिषाने  शिझानसाठी खास पोस्ट शेअर केली होती. मला असंच वर घेणाऱ्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा ! तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मेहनती, भावुक, उत्साहित आणि खूप चांगले व्यक्ती आहात. तुम्हालाच नाही माहित की तुम्ही कसे आहात आणि हे त्याहुन चांगले आहे. एक व्यक्ती समाज आणि परिवारासाठी बलिदान करतो, त्याला ओळखणे आणि त्याचा आदर करण्याची वेळ आली आहे. सर्व पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

घडलेल्या घटनेनंतर तुनिषाच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दुपारी शिझान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शीझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अली बाबा या टीव्ही शोमध्ये शीजान हा तुनिषा सहकलाकार होता.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीसटेलिव्हिजन