तुनिषा टेन्शन आणि 'ओसीडी'चा करत होती सामना, पोलिसांनी कोर्टात केले धक्कादायक खुलासे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:49 PM2022-12-30T18:49:56+5:302022-12-30T18:53:11+5:30
टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनं मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनं मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तिच्या अशा अचानक जाण्यानं आणि ती गेल्यानंतर सुरू झालेल्या विविध चर्चांनी इंडस्ट्रीमधील वातावरण ढवळून निघालं आहे. यातच तुनिषाच्या आत्महत्येबाबत नवे अपडेट्स समोर आले आहेत. नुकतंच मुंबईच्या सत्र न्यायालायत याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी काही खुलासे केले आहेत. यात शीजन खानसोबतच्या ब्रेकअपमुळे तुनिषा शर्मा डिप्रेशनमध्ये होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिजान खानच्या अडचणीत वाढ, पोलीस कोठडीत राहावं लागणार
शीजानच्या खानवर तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शीजान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहे आणि शीजानच्या पोलीस कोठडीत आज एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
"शीझानने ब्रेकअपच्या दिवशी तुनिशाला मारली थप्पड, बुरख्यासाठी टाकायचा दबाव"; आईचा आरोप
"तुनिषा खूप संवेदनशील होती. ती टेन्शन आणि ओसीडीचाही सामना करत होती. आरोपी शीजान खाननं तिच्या उपचारासाठी तीन डॉक्टरांची शिफारस केली होती. शीजानला यासर्व बाबींची पूर्णपणे माहिती होती. तरीही तो तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आला आणि तिच्या मर्जीच्या विरोधात जाऊन नातं तोडलं", असं पोलिसांनी कोर्टात म्हटलं आहे.
ब्रेकअपनंतरही एकत्र करावं लागत होतं काम
इतकंच नाही, तर पोलिसांनी तुनिषाच्या ब्रेकअपनंतरचीही माहिती कोर्टाला दिली आहे. "ब्रेकअपनंतरही तुनिषा रोज शीजानसोबत सेटवर काम करत होती. शीजानला विसरणं तिला खूप कठीण जात होतं. ती सेटवर खूप दु:खी असायची", असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं आहे. शीजान तिची काळजी घेण्याचं ढोंग करणारा मित्र होता असाही आरोप पोलिसांनी केला आहे. "शीजान यानच तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यासारखं आहे. हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची गरज आहे", असं पोलीस म्हणाले.
कोर्टासमोर सादर केली गेली माहिती
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार आत्महत्येआधी शीजान आणि तुनिषा यांच्यात संभाषण झालं होतं. या संभाषणानंतर शीजान शुटिंगसाठी गेला आणि तुनिषानं त्याचा गेटपर्यंत पाठलाग केला. मग ती स्वत:च्या रुममध्ये परतली. तिचा मोबाइल फोन ठेवला आणि आरोपीच्या मेकअप रुममध्ये गेली. जिथं तिनं गळफास घेत आत्महत्या केली.