'इच्छामरण' या संकल्पनेला आपला समाज सहसा स्वीकारत नाही. स्वतःचे मरण निवडण्याचा अधिकार म्हणजेच 'इच्छामरण' ! त्यामुळे, या गंभीर विषयावर मुक्तपणे बोलताना समाजात कोणी दिसतदेखील नाही. 'बोगदा' या सिनेमाद्वारे याच विषयावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' सिनेमाच्या माध्यमातून इच्छामरणाची संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात मराठीची गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी महत्वपूर्ण भूमिकेत आहे. त्या दोघींनी या आधी कुंकू या मालिकेत काम केले होते. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. आता त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तसेच अभिनेता रोहित कोकाटे याचीदेखील या सिनेमात विशेष भूमिका आहे. आजारी आईच्या इच्छामरणावर मुलीने उचललेले पाऊल आणि तिच्या भावनिकतेचा झालेला गुंता या सिनेमात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीफळीत करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांसोबत दिग्दर्शिका निशिता केणी यांचादेखील समावेश आहे. जन्म आणि मृत्यू या आयुष्यातील दोन दरवाजांमधील 'बोगदा' दाखवणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नवा वैचारिक दृष्टीकोन देणारा ठरणार आहे, हे नक्की बोगदा हा सिनेमा आई आणि मुली यांच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय-लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझर मध्ये त्यांच्यातील हळूवार नाते आपल्याला पाहायला मिळत आहे.
इच्छामरणाच्या वाटेवरील वैचारिक 'बोगदा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 4:02 PM
'इच्छामरण' या संकल्पनेला आपला समाज सहसा स्वीकारत नाही. स्वतःचे मरण निवडण्याचा अधिकार म्हणजेच 'इच्छामरण' ! त्यामुळे, या गंभीर विषयावर मुक्तपणे बोलताना समाजात कोणी दिसतदेखील नाही.
ठळक मुद्दे मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी महत्वपूर्ण भूमिकेत आहे'बोगदा'मधून इच्छामरणाची संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे