Join us

परिणीतीचे सिक्रेट आयटम साँग

By admin | Published: June 30, 2016 1:09 AM

बॉलीवूडमध्ये जर एखादी हीरोईन आयटम साँग करणार असेल तर त्याची सुरुवातीपासूनच चर्चा होते.

बॉलीवूडमध्ये जर एखादी हीरोईन आयटम साँग करणार असेल तर त्याची सुरुवातीपासूनच चर्चा होते. मग असे असताना परिणीती करत असलेल्या एका आयटम नंबरबद्दल एवढी गुप्तता का बाळगली जातेय? वरुण-जॅकलिन-जॉन स्टारर ‘ढिश्शूम’ चित्रपटात परिणीती एक आयटम साँग करत असून त्याची शूटिंग मुंबईतील मेहबुब स्टुडिओमध्ये सुरू आहे. पण याची कुठेच वाच्यता केली जात नाहीये. सेटच्या बाहेर नेहमीपेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून गाण्याचे बोल किंवा सेटवरील फोटो लीक होऊ नयेत म्हणून एवढी काळजी घेतली जात आहे. हे गाणे वरुण धवन आणि परिणीतीवर चित्रित करण्यात येत आहे, अशी माहिती मिळत आहे. आता एवढी सुरक्षा पाळली जातेय म्हटल्यावर हे गाणे खूपच स्पेशल असले पाहिजे. अन्यथा मग इतकी काळजी करून फायदा काय?