अभिनेत्री नुपूर अलंकारच्या मदतीला ही मराठी अभिनेत्री आली धावून,सोशल मीडियावर इतरांनाही मदतीसाठी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 04:53 PM2020-06-11T16:53:09+5:302020-06-11T16:53:42+5:30

लॉकडाउनमुळे ते सुद्धा बंद झाले आहे. तिच्या आईच्या उपचारासाठी कृपया जमेल तितकी आर्थिक मदत करा’, असे रेणुका यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

TV actor Nupur Alankar in financial distress, friend Renuka Shahane posts plea for help | अभिनेत्री नुपूर अलंकारच्या मदतीला ही मराठी अभिनेत्री आली धावून,सोशल मीडियावर इतरांनाही मदतीसाठी केले आवाहन

अभिनेत्री नुपूर अलंकारच्या मदतीला ही मराठी अभिनेत्री आली धावून,सोशल मीडियावर इतरांनाही मदतीसाठी केले आवाहन

googlenewsNext

आर्थिक अडचणीमुळे अभिनेत्री नुपूर अलंकारजवळ आईच्या उपचारासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे नुपूरने चाहत्यांनाच मदतीची विनंती केली होती. नुपूरने सांगितले होते की, आईच्या खर्चासाठी लागणारी ही रक्कम खूपच आहे. त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझ्या आईच्या उपचारासाठी तुम्हाला जितकी शक्य आहे तितकी मदत करा. तुमची ही मदत माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता नुपूरच्या मदतीसाठी अभिनेत्री रेणुका शहाणेही पुढे आली आहे.

रेणुका यांनी फेसबुकवर लिहिले, ‘नुपूरचे सर्व पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याचा फटका तिलाही बसला आहे. तिच्या कमाईतून आतापर्यंत ती आईचा उपचार करत होती. मात्र लॉकडाउनमुळे ते सुद्धा बंद झाले आहे. तिच्या आईच्या उपचारासाठी कृपया जमेल तितकी आर्थिक मदत करा’, असे रेणुका यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

नुपूरचे दुस-या बँकांमध्येही खाते होते. त्यातील रक्कम तिने काही वर्षांपूर्वी पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत ट्रान्सफर केली होती. संपूर्ण जमापुंजी याच बँकेत असल्याने आता आर्थिक अडचणीचा सामना तिला करावा लागत आहे.नुपूर 'स्वरागिनी', 'इस प्यार को क्या नाम दूंँ', 'दिया और बाती हम', 'अगले जनम मोहे बिटियाँ ही किजो' आणि 'घर की लक्ष्मी बेटियाँ' यांसारख्या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्येही तिने काम केले आहे.
 

Web Title: TV actor Nupur Alankar in financial distress, friend Renuka Shahane posts plea for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.