Join us

टीव्हीवरील आघाडीचे कलाकारही म्हणतायेत “#बातउठाओबातबदलो!”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 6:00 AM

सोशल मीडियावर सध्या #MeToo या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या आरोपांनी चित्रपटसृष्टी हादरत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकार या मोहिमेला पाठिंबा दर्शवत आहेत.

सध्या सर्वत्र #MeToo मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक अभिनेत्री, मॉडेल्स त्यांच्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडत आहेत. सोशल मीडियावर सध्या #MeToo या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या आरोपांनी चित्रपटसृष्टी हादरत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकार या मोहिमेला पाठिंबा दर्शवत महिलांवरील होणा-या अत्याचारांना कुठे तरी आळा बसावा यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करताना दिसतायेत. नुकतेच ‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळ्या’त मोहित मलिक, गौरव सरीन आणि राघव जुयाल या आघाडीच्या अभिनेत्यांनी एक शक्तिशाली नाट्य सादर करून या क्षेत्रात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात त्यांना पाठिंबा दर्शविला. एक नाट्य सादर करत  “#बातउठाओबातबदलो!” हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. महिलांवरील गंभीर अत्याचारांचे वास्तव उघड करणारा हे नाट्य असून आता या घटनांचा अंत करण्याची वेळ आली आहे, असा संदेश  यातून देण्यात आला. हा नाट्यप्रवेश प्रेक्षकांच्या डोळ्यांत केवळ अंजन घालणारा नसून त्यांना सशक्त करणारा ठरेल.

 

कुल्फीकुमार बाजेवाला मालिकेत सिकंदरची भूमिका साकारणारा मोहित मलिक यासंदर्भात म्हणाला, “अलीकडच्या काळात महिलांची लैंगिक सतावणूक करणा-या जितक्या घटना प्रकाशात आल्या आहेत, ती गोष्ट मन अस्वस्थ करणारी आहे. “#बातउठाओबातबदलो!” हा नाट्यप्रवेश म्हणजे महिलांना अशा प्रसंगांबद्दल वाटणारा संकोच दूर करून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यास शक्ती देणारं एक छोटं पाऊल आहे. या नाटकातून आम्हाला या विषयाचं गांभीर्य जाणवून द्यायचं होतं आणि भारतातील महिलांना अशा प्रसंगांपासून सुरक्षा देण्यासाठी एक चळवळ उभी करण्याची वेळ आली आहे, हे सूचित करायचं होतं. ‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळ्या’त या ज्वलंत विषयाला आमचा असलेला पाठिंबा दर्शविण्याची एक संधी या नाटकामुळे आम्हाला मिळाली, याबद्दल आम्ही आभारी आहोत. भारतात महिलांसाठी एक सुरक्षित आणि चांगली व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे त्याने यावेळी सांगितले.” 

टॅग्स :मीटूस्टार प्लस