Join us

ब्लॅकमेल, शोषणाला बळी पडली 'ही' टीव्ही अभिनेत्री; इंडस्ट्रीतील काळे धंदे केले उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 1:13 PM

फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही.

फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. टीव्ही अभिनेत्री रौशनी श्रीवास्तव ही एक गायिका देखील आहे. रघुकुल रीत सदा चली आई या मालिकेतून रौशनीला ओळख मिळाली. मात्र या इंडस्ट्रीत टिकणे काही सोपे नसल्याचं तिने सांगितले आहे. अनेक संकंटांचा सामना तिने केला आहे. तिने इंडस्ट्रीतील अनेक काळे धंदे समोर आणले आहेत.

एका मुलाखतीत रौशनी म्हणाली, ' या इंडस्ट्रीत टिकून राहणे अवघड आहे. इथे कास्टिंग काऊच आहे, गट आहेत. एखाद्या स्ट्रगलिंग अॅक्टरला अनेकदा आर्थिक संकटाला आणि डिप्रेशन सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. करिअरच्या सुरुवातीला मी खूप स्ट्रगल केले आहे. शोषण आणि धमक्यांचा सामना केला आहे. अनेकदा मला मानसिक त्रास दिला गेला आहे. ब्लॅकमेल केले गेले आहे. मी चांगल्या संगतीत नव्हते. जर कोणी फिल्म बॅकग्राऊंडचे नसेल तर त्यांना या गोष्टी कराव्या लागतात.

रौशनी पुढे म्हणाली, 'ज्यांनी मला कोणतीही अट न ठेवता काम दिले त्यांचे मी मनापासून आभार मानते. मला आठवते जेव्हा मी १०० ऑडिशन दिले त्यापैकी केवळ २० जणांनी मला अट न ठेवता काम दिले. 

अॅक्टरचे आयुष्य कसे असते ? 

रौशनी सांगते, ' इथे योग्य लोकांची पारख होणे हे फार अवघड असते. इथे लोकं आपलाच एक गट बनवतात आणि त्यांच्याचसोबत काम करतात. आपण कशा प्रकारच्या गटाचा भाग आहोत हे ओळखता आले पाहिजे. एखादी मोठी आणि चांगली भुमिका मिळावी म्हणून एखादया गटाचा भाग व्हावंच लागतं. इथे नशीबही लागतं हेही तितकंच खरं आहे. नशीब तुम्हाला योग्य लोकांपर्यंत घेऊन जाते. 

टॅग्स :कास्टिंग काऊचहिंदीटेलिव्हिजन