Join us

राहुल वैद्यच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; हॉट पिंक मोनोकिनीमध्ये केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 16:19 IST

Disha parmar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिशा परमारने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिचा सिजलिंग लूक पाहायला मिळत आहे.

लोकप्रिय गायक राहुल वैद्य (rahul vaidya) आणि त्याची पत्नी दिशा परमार  (disha parmar) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. छोट्या पडद्यावरील संस्कारी अभिनेत्री म्हणून दिशाने तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कायम साडी वा ड्रेसमध्ये दिसणाऱ्या दिशाने यावेळी मोनोकिनी परिधान करत चाहत्यांना क्लीन बोल्ड केलं आहे. अलिकडेच तिने बीचवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिशा परमारने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिचा सिजलिंग लूक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दिशाने हॉट पिंक रंगाची मोनोकिनी परिधान केली असून ती समुद्राच्या पाण्यातून बीचवर येताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत तिने 'Straight outta Baywatch' , असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, दिशाचा हा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून अनेकांनी तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्रींसोबत केली आहे. तसंच काही जणांनी संमिश्र प्रतिक्रिया देत दू साडी किंवा ड्रेसमध्येच छान दिसते असंही म्हटलं आहे.

टॅग्स :राहुल वैद्यसेलिब्रिटीटेलिव्हिजन