कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. चित्रपट आणि मालिकांचे शूटींगही ठप्प आहे. अशात लोक टीव्हीवर जुन्या मालिका, जुने एपिसोड पाहत आहेत. पण आता हे जुने एपिसोड पाहून कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अन्य मालिकांचे शूटींग सुरु होवो ना होवो पण ‘गुड्डन तुमसे न हो पाएगा’ या मालिकेचे शूटींग मात्र सुरु झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सगळ्या मालिकांचे शूटींग ठप्प असताना या मालिकेचे नवे एपिसोड प्रेक्षकांना आता पाहता येणार आहेत.
होय, ‘गुड्डन तुमसे न हो पाएगा’ या मालिकेच्या मेकर्सनी शूटींग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लॉकडाऊनच्या काळात हे कसे शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण ‘गुड्डन तुमसे न हो पाएगा’चे मेकर्स व कलाकार ते शक्य करून दाखवणार आहेत. होय, आपआपल्या घरात राहून कलाकार या मालिकेच्या नव्या एपिसोडचे शूटींग करणार आहेत.‘गुड्डन तुमसे न हो पाएगा’त लीड रोल साकारणारा निशांत मलखानी याने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. आम्ही लोकांना काही नवे देण्याचा प्रयत्न करतोय. हा एक प्रयोग आहे आणि या प्रयोगाचे परिणाम चांगले येतील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सगळे कलाकार आपआपल्या घरात राहून आपआपल्या फोनने शूट करू. नंतर हे व्हिडीओ एकत्र जोडून एडिट केले जातील.
मालिकेचा अन्य अभिनेता अनुज कोहली हा सुद्धा या नव्या प्रयोगासाठी उत्सुक आहे. आम्हाला आमचे डायलॉग मिळाले आहेत. डायरेक्टर शॉट अप्रूव्ह करणार आणि आम्ही घरात शूट केलेले सीन एकत्र जोडले जाणार. चॅनलने परवानगी दिली तर आम्ही याच पद्धतीने शूटींग सुरु ठेऊ, असे त्याने सांगितले.