Join us

Bigg boss marathi: घरातील सदस्यांनी गायत्री दातारला टाकलं वाळीत? विकास-सोनालीचं 'ते' संभाषण चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 12:27 IST

Bigg boss marathi: घरात गायत्री दातारला तिच्या टीमनेच एकटं पाडलं आहे. त्यामुळे आता गायत्रीला एकप्रकारे वाळीत टाकलं आहे, असं मत विकासचं आहे.

छोट्या पडद्यावर सध्या चांगलाच गाजत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी ( bigg boss marathi 3). यंदा या शोचं तिसरं पर्व सुरु असून हे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. हा कार्यक्रम सुरु होतांना घरात १५ स्पर्धकांनी एन्ट्री केली होती. त्यानंतर हळूहळू एक-एक करत अनेक स्पर्धकांचा प्रवास अर्ध्यावर संपला. यामध्येच आता बिग बॉसच्या घरात हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच स्पर्धक राहिले आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धकांमधील अनेक जण सुरुवातीच्या काळात एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, आता त्यांच्यात फूट पडल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर आता या घरात गायत्री दातारला तिच्या टीमनेच एकटं पाडलं आहे. त्यामुळे आता गायत्रीला एकप्रकारे वाळीत टाकलं आहे, असं मत विकासचं झालं आहे. याविषयी त्याने सोनालीलादेखील सांगितलं. 

'बिग बॉस' हा शो सुरु झाल्यापासून घरातील  टीम A ही सगळ्यात स्ट्राँग टीम म्हणून ओळखली जात होती. कोणत्याही कठीण प्रसंगात या टीममधील सदस्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. परंतु, आता या टीम मेंबर्सने गायत्रीला मात्र एकटं सोडलं आहे. याविषयी आज विकास पाटील आणि सोनाली पाटील चर्चा करतांना दिसणार आहेत. 

Bigg boss marathi: सुबोध भावेमुळे होणार घरात राडा? नव्या टास्कमुळे स्पर्धकांची उडणार तारांबळ 

सध्या टीम A मध्ये फूट पडली असून जय, मीरा आणि उत्कर्ष यांनी गायत्रीसोबत अबोला धरला आहे. बऱ्याचदा ते आपआपसात गायत्रीविषयी चर्चा करतांना दिसतात. गायत्रीने कशाप्रकारे विश्वासघात केला, ती विकास आणि सोनालीच्या मागे-पुढे कसं करते, यावरच त्यांची चर्चा होतांना दिसते.याचविषयी आज विकास-सोनाली चर्चा करणार आहेत. 

सध्या टीम A ज्या पद्धतीने गायत्रीसोबत वागत आहे ते पाहून विकास-सोनाली खंत व्यक्त करतांना दिसणार आहेत. "जय मला म्हणत होता पहिल्यापासून तिला कसं खेळायचं हे आम्ही तिला गाईड करत आलो, तो त्याची बाजू मांडत होता. तर मी म्हटलं बरोबर आहे पण, मी तुला तेच सांगते तुमच्या दोघांबद्दल तिची काहीच तक्रार नाहीये. कशाला त्या मुलीबद्दल...आधीच पाण्यात बघतात तिला, लागलं आहे तिच्या हाताला त्या गोष्टीचं काहीचं नाही त्यांना. तिचं जाऊदे या दोघांना...", असं सोनाली विकासला सांगते. त्यावर विकास त्याचं मत मांडतो. 

"पण तिला त्यांनी असं पूर्णत: वाळीत टाकल्यासारखचं केलं आहे म्हणजे एक असतं ना की, आता काय ही जाणारच आहे, त्यामुळे काय आता आपल्याला उपयोग काही नाही त्या पध्दतीनेचं चालू आहे...", असं विकास म्हणतो. त्यामुळे आता टीम A ने गायत्रीला खरंच वाळीत टाकलंय का? खरंच तिच्याशी त्यांनी मैत्री तोडलीये का? या सगळ्याला गायत्री कशा प्रकारे सामोरी जाणार हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रिटीटिव्ही कलाकारगायत्री दातार