Join us

कुशलप्रमाणेच या कलाकारांनी देखील आत्महत्या करून संपवले आपले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 7:15 AM

छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. अतिशय लहान वयात या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.

ठळक मुद्देप्रत्युषा बॅनर्जीला बालिका वधू या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील आनंदी या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. ती केवळ 25 वर्षांची असताना 1 एप्रिल 2016 ला प्रत्युषाने आत्महत्या केली. 

टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कुशलच्याआधी देखील छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. अतिशय लहान वयात या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.

नफिसा जोसेफनफिसा जोसेफ केवळ 26 वर्षांची असताना तिने आत्महत्येसारखे कठीण पाऊल उचलले होते. 29 जुलै 2004 मध्ये राहात्या घरी नफिसाचा मृतदेह आढळला होता.

कुलजीत रंधावाकुलजीत रंधवाने अनेक हिट मालिका दिल्या होत्या. अनेक मालिकांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. कुलजीतचे करियर उमेदीवर असताना तिने आत्महत्या करत तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता. 8 फेब्रुवारी 2006 ला तिच्या राहात्या घरी तिने आत्महत्या केली होती. तिने सुसाईट नोटमध्ये लिहिले होते की, माझ्या आयुष्यात सुरू असलेला तणाव आता मी सहन करू शकत नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

विवेका बॅनर्जी25 जून 2010 ला राहात्या घरी गळफास घेऊन विवेकाने आत्महत्या केली होती. विवेकाने तिच्या आत्महत्येसाठी तिच्या पूर्वप्रियकराला जबाबदार धरले होते.

प्रत्युषा बॅनर्जीप्रत्युषा बॅनर्जीला बालिका वधू या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील आनंदी या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. ती केवळ 25 वर्षांची असताना 1 एप्रिल 2016 ला प्रत्युषाने आत्महत्या केली. 

निरोशानिरोशाने तेलगु टिव्ही इंडस्ट्रीत आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले होते. प्रियकराशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलताना तिने आत्महत्या केली होती. 

 

टॅग्स :कुशल पंजाबी