Join us

ट्विंकल खन्नाला वडिलांनी दिला होता एकाचवेळी 4 बॉयफ्रेन्ड बनवण्याचा सल्ला, कारण ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 1:56 PM

ट्विंकलने फादर्स डे निमित्ताने तिचे वडील दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबाबतीत भरभरून लिहिले आहे.

ठळक मुद्देराजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबरला झाला होता. 1973 साली याच दिवशी ट्विंकलचा जन्म झाला होता. तिच्यासाठी तिच्या वडिलांचा वाढदिवस हाच फादर्स डे आहे.

आज फादर्स डे. फादर्स डेच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्या वडिलांसाठी पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही सुद्धा यापैकी एक. ट्विंकलने  वडिल राजेश खन्ना यांच्यावर एक मोठा लेख लिहिला. मात्र तिचा हा लेख  वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजेश खन्ना यांच्यासोबतचा एक ब्लॅक अ‍ँड व्हाईट फोटो तिने शेअर करत या लेखाची लिंक तिने दिली आहे.   तिचे तिच्या वडिलांसोबतचे नाते कसे होते, हे तिने यात सांगितले आहे.

ती लिहिले, आज फादर्स डे साजरा केला जातोय. पण माझ्यासाठी फादर्स डे डिसेंबरमध्ये असतो. त्यांच्या 31 व्या जन्मदिनी मी या जगात जन्मले होते. माझ्या रूपात माझ्या आईने त्यांना जगातील सर्वात मोठी भेट दिली, असे ते आईला म्हणाले होते. ते नेहमी मला टीना बाबा म्हणत. त्यांनी कधीच मला बेबी म्हणून हाक मारली नाही. मी यावर कधीच लक्ष दिले नाही. मात्र माझे पालनपोषण अन्य मुलींसारखे झाले नाही, हे तितकेच खरे. ते पहिले व्यक्ती होते, यांनी मला दारूचा पहिला घोट पाजला होता. त्यांनीच माझ्या हातात स्कॉचने भरलेला ग्लास दिला होता.

 मी वयात आल्यावर डेटींग सुरु केले, तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत खूप चर्चा केली होती. कधी एकच बॉयफ्रेंड नको बनवू, नेहमी 4 बॉयफ्रेंड असू दे. म्हणजे तुझा प्रेमभंग होणार नाही, असा सल्ला त्यांनी मला दिला होता. पण ते एकमेव होते ज्यांच्यामध्ये माझे हृदय तोडण्याची क्षमता होती.राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबरला झाला होता. 1973 साली याच दिवशी ट्विंकलचा जन्म झाला होता. तिच्यासाठी तिच्या वडिलांचा वाढदिवस हाच फादर्स डे आहे.

 

टॅग्स :ट्विंकल खन्नाराजेश खन्ना