Join us

अक्षय कुमार घरी असल्याने ही गोष्ट करू शकत नाहीये ट्विंकल खन्ना, तिनेच सांगितले याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:02 PM

ट्विंकलनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितली आहे.

ठळक मुद्देट्विंकलने या फोटोसोबत लिहिले आहे की, अक्षय नितारासोबत बिझी असल्याने मी माझ्या पुस्तकावर काम करू शकेन असे मला वाटले होते. पण मला लिखाणावर माझे लक्ष केंद्रित करता येत नाहीये.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. अक्षय कुमार एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. पण कोरोनामुळे सगळ्याच चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले असल्यामुळे तो त्याच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. पण आता अक्षय घरी असल्यामुळे त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाला मनस्ताप झाला आहे. तो घरी असल्याने ट्विंकल तिचे काम करू शकत नाहीये. तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे.

ट्विंकल ही अभिनेत्री असली तरी तिने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे. ट्विंकलला अभिनेत्री म्हणून यश मिळवता आले नसले तरी तिने एक लेखिका म्हणून तिची आज एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय सध्या घरी असल्यामुळे ट्विंकलला तिच्या नवीन पुस्तकासाठी लिखाण करता येत नाहीये. तिनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितली आहे. ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात अक्षय त्यांची मुलगी नितारासोबत खेळताना दिसत आहे तर समोर लॅपटॉप आणि काही पेपर दिसत आहेत. ट्विंकलने या फोटोसोबत लिहिले आहे की, अक्षय नितारासोबत बिझी असल्याने मी माझ्या पुस्तकावर काम करू शकेन असे मला वाटले होते. पण मला लिखाणावर माझे लक्ष केंद्रित करता येत नाहीये. त्यामुळे मी आता बाथरूममध्ये बसूनच लिखाण करणार आहे.

ट्विंकलच्या मिसेस फनी बोन्स, द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद आणि पायजमाज आर फॉरगिव्हन या पुस्तकांना वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आता ती तिच्या चौथ्या पुस्तकाच्या लिखाणात व्यग्र आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना