महाराष्ट्राचा अभिमान असलेले, मराठी मनावर राज्य करणारे बाळासाहेब ठाकरे यांना 'मानाचा मुजरा' कलर्स मराठी वाहिनीने आजवर विविध विषय हाताळून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत स्मरलेला 'मानाचा मुजरा' हा विशेष कार्यक्रम रविवार दिनांक २० जानेवारी २०१९ रोजी कलर्स मराठीवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे, युवा शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राजू कुलकर्णी, गायक सुरेश वाडकर अभिनेता सुबोध भावे यांसारख्या विविध क्षेत्रातील रथी-महारथींना एकाच वेळी एकाच स्टेज वर स्तुत्यभाव रेखाटताना पाहण्याचा विलक्षण योग अद्वितीय आहे. बाळासाहेब ठाकरे यांना 'मानाचा मुजरा' या कर्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, संपूर्ण ठाकरे कुटुंबिय एकत्र उपस्थित असणं ह्या कार्यक्रमाचे विशेष औचित्य दर्शवते. सुधीर गाडगीळ, द्वारकानाथ संझगिरी, अवधूत गुप्ते यांसारख्या अवलियांच्या प्रश्नांनी कधी भावनिक करून तर कधी नर्मविनोदांनी कार्यक्रमास रंगत आणली.
रोमांचित करणाऱ्या वीरश्री पोवाड्यासह बाळासाहेहबांना शाहिरी मुजरा करीत एका विलक्षण अंदाजात या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी अनुभवलेले बाळासाहेब आज नव्याने आपल्यासमोर उलगडण्यात आले. एरव्ही महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखलेजाणाऱ्या हिंदुहृदयसम्राटांमधील एक वडील व आजोबा उलगडताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे भावुक झाले. संजय राऊत प्रस्तुत, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स आणि राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी निर्मित 'ठाकरे' येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.