Join us

या कारणासाठी लता मंगेशकर यांनी लावली थेट उदित नारायणच्या घरी हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 7:15 AM

भूतकाळातील काही किस्से सांगताना उदित नारायणने त्याच्या जीवनातील एक संस्मरणीय किस्सा सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमात सांगितला.

ठळक मुद्देउदित नारायणने सांगितले की, अर्ध्या तासात लता मंगेशकर माझ्या घरी आल्या होत्या. बॉलिवूडमधील इतक्या प्रसिद्ध गायिका माझ्या डायनिंग हॉलमध्ये बसल्या आहेत यावर माझाच विश्वास बसत नव्हता.

सध्या छोट्या पडद्यावर अनेक रिअ‍ॅलिटी शो सुरू आहेत. यापैकीच एक शो म्हणजे, ‘सुपरस्टार सिंगर’. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला स्पर्धक एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेस सादर करत आहेत. हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात गायक उदित नारायण हजेरी लावणार आहे. उदित ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्याची गाजलेली गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

 भूतकाळातील काही किस्से सांगताना उदित नारायणने त्याच्या जीवनातील एक संस्मरणीय किस्सा सांगितला. तो म्हणाला, “वीर झारा चित्रपटातील सर्व गाणी ही मी आणि लता मंगेशकर यांनी एकत्र गायली आहेत. त्यातले फक्त एक गाणे हे माझे एकट्याचे होते.  ते मदन मोहनजींचे एक अप्रतिम असे रोमॅंटिक गीत होते... जानम देख लो. ते गाणे ऐकल्यानंतर लताजींनी स्वतः मला कॉल केला आणि माझ्या गाण्याची प्रचंड प्रशंसा केली आणि इतकेच नव्हे तर त्या अर्ध्या तासात मला भेटायला येत असल्याचे त्यांनी मला सांगितले. खरे तर यावर माझा विश्वासच बसेना, कोणी तरी आपली चेष्टा करत आहे असे वाटून मी फोनवर चेष्टा थांबवण्यास सांगितले. 

पुढे उदित नारायणने सांगितले की, अर्ध्या तासात लता मंगेशकर माझ्या घरी आल्या होत्या. बॉलिवूडमधील इतक्या प्रसिद्ध गायिका माझ्या डायनिंग हॉलमध्ये बसल्या आहेत यावर माझाच विश्वास बसत नव्हता. एक तास माझ्या गाण्याबद्दल माझ्याशी चर्चा केल्यानंतर लताजींनी माझ्याकडे दार्जिलिंगचा चहा आणि मसाला पोह्याची गोड मागणी केली. ती मागणी ऐकून मी इतका भावानवश आणि आनंदित झालो की, लहानपणापासून जे माझे दैवत होते, त्या व्यक्तीने स्वतः माझ्या घरी येऊन माझ्या गाण्याचे कौतुक करावे आणि माझ्याकडे अशी गोड मागणी करावी! माझ्या आयुष्यातील तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. 

टॅग्स :उदित नारायणलता मंगेशकर