Join us

उमेश कामतने शेअर केला प्रिया बापटसोबतचा रोमँटिक मूडमधील फोटो, म्हणाला - 'तुझ्यासारखे कुणीच नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 6:56 PM

प्रिया बापट आणि उमेश कामतचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतेच उमेशने प्रियासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे.प्रिया आणि उमेशच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. उमेश कामतनेप्रिया बापटसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले की, तुझ्यासारखे कुणीच नाही आणि तिच तुझी खरी शक्ती आहे. या दोघांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. त्यांच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

प्रिया बापट आणि उमेश कामत बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. त्यांचा रोमँटिक अंदाज बऱ्याचदा चाहत्यांना भावतो आणि बऱ्याचदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.

उमेश कामतने असा दिला होकारसहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होकार दिला.

उमेश आणि प्रियाच्या वयात ८ वर्षांचे अंतरउमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर २०११ साली लग्न केले. 

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापट