Join us

'हर हर महादेव' चित्रपट पाहून वंचित मुलांनी लुटला दिवाळीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 2:33 PM

दिवाळीचा आगळावेगळा आनंद लुटण्यासाठी या संस्थेने यंदाची दिवाळी 'हर हर महादेव' चित्रपट पाहून साजरी केली.

दिवाळी म्हटलं की, फराळ आणि कुटुंबाबरोबर सेलिब्रेशन. लॉकडाऊनच्या ब्रेक नंतर ही दिवाळी सगळ्यांसाठीच स्पेशल होती. या दिवाळीत प्रदर्शित झालेला 'हर हर महादेव'ही तितकाच खास ठरला आहे. सर्वत्र चर्चेत असलेल्या 'हर हर महादेव' या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून सध्या चित्रपटगृहात हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसत आहेत. दिवाळीबरोबरच सध्या या चित्रपटाचेही सेलिब्रेशन अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे.

याच सेलिब्रेशनमध्ये सीबझ संस्थेने अनोख्या प्रकारे दिवाळी साजरी केली. यंदा सीबझ संस्थेने वंचित मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. दिवाळीचा आगळावेगळा आनंद लुटण्यासाठी या संस्थेने यंदाची दिवाळी 'हर हर महादेव' चित्रपट पाहून साजरी केली. चित्रपट पाहून मुलं आनंदी झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे कर्तृत्व या चित्रपटामुळे त्यांना कळले. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल त्यांना माहिती मिळाली. अश्याप्रकारे ही दिवाळी त्यांच्याकरीता अनोखी ठरली. 

सुनिल फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'हर हर महादेव' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात शरद केळकर, अमृता खानविलकर, सुबोध भावे, सायली संजीव हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :सुबोध भावे शरद केळकरअमृता खानविलकर