WWE रेसलिंगच्या जगातील सर्वात जास्त गाजलेलं नाव कोणतं असेल तर ते आहे द अंडरटेकर. लोकांच्या मनात अंडरटेकरच्या अनेक आठवणी आहेत. त्याची धमाकेदार एन्ट्री, त्याचा लूक आणि त्याची खेळण्याची स्टाइल सर्वांना चकीत करणारीच आहे. त्याने मोठमोठ्या फायटर्सना धूळ चारली आहे. पण आता अंडरटेकरने WWE च्या दुनियेतून रिटायरमेंट घेतलं आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स जरा नाराज आहेत आणि आपल्या सुपरस्टारला ट्रिब्यूट देत आहेत. अंडरटेकरची लोकप्रियता जगभरात आहे. त्याला बॉलिवूडच्या एका मोठ्या सिनेमातही कास्ट केलं होतं.
१९९६ मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या 'खिलाडीयों का खिलाडी'मध्ये द अंडरटेकरचा एक रोल होता. आता इतक्या मोठ्या स्टारला बॉलिवूड सिनेमात कास्ट करणं जरा अवघड काम होतं. ते सोपं करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भूमिकेचं ना द अंडरटेकरच ठेवण्यात आलं. पण त्याच्या जागी त्याचा डुप्लिकेट चेहरा समोर आणला गेला. जवळपास अंडरटेकरसारखाच दिसणारा चेहरा. नाव होतं ब्रायन ली. ब्रायन ली पेशाने एक रेसलर आहे आणि त्याचीही चांगली फॅन फॉलोईंग आहे. त्याचा चेहरा आणि पर्सनॅलिटी अंडरटेकरसारखीच आहे. अंडरटेकरची हाइट ६ फूट १० इंच आहे तर ब्रायन ६ फूट ७ इंच उंच आहे.
ब्रायनला 'खिलाडीयों का खिलाडी'सिनेमात द अंडरटेकरची भूमिका साकारायला मिळाली होती. त्याचा लूकची खतरनाक ठेवण्यात आला होता आणि प्रेक्षकांचं लक्ष आकर्षित करण्यात यशस्वी ठरला होता. या सिनेमात WWF रेसलर क्रशही महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. हा सिनेमा व्हिलन म्हणून पहिला सिनेमा होता. त्यासोबतच गुल्शन ग्रोव्हरही यात होता. सिनेमा सुपरहिट ठरला होता.