Join us  

गणवेशांची कहाणी सांगणारा ‘गणवेश’

By admin | Published: June 18, 2016 3:47 AM

शाळेमध्ये शिकत असताना प्रत्येकालाच गणवेश घालावा लागतो. काहींना तो गणवेश आवडतो तर काहींना सक्तीने घालावा लागतो. परंतु या गणवेशाची कहाणी ही काही फक्त शाळेपुरतीच मर्यादित

शाळेमध्ये शिकत असताना प्रत्येकालाच गणवेश घालावा लागतो. काहींना तो गणवेश आवडतो तर काहींना सक्तीने घालावा लागतो. परंतु या गणवेशाची कहाणी ही काही फक्त शाळेपुरतीच मर्यादित आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर ते साफ चुकीचे आहे. शाळा संपली आता कॉलेजचे वेध लागले अन् गणवेशाची कटकट गेली, असे जरी असले तरी आपल्याला प्रत्येक वेळी कोणता ना कोणता गणवेश हा घालावाच लागतो. माणूस रिटायरमेंटपर्यंत विविध गणवेश त्याच्यावर चढवीत असतोच. मग कधी तुम्ही पोलीस अधिकारी झालात तर तो युनिफॉर्म अगदी रुबाबदारपणे अंगावर चढविताना कॉलर टाइट तर होतेच ना. तर काहींचा राजकीय गणवेश असतो. असे विविध प्रकारचे गणवेश प्रेक्षकांना अतुल जगदाळे दिग्दर्शित गणवेश या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात महत्त्वाची भूमिका करणारे अभिनेते किशोर कदम गणवेशबद्दल सांगताना म्हणतात, प्रत्येक माणूस गणवेश परिधान करत असतो. आॅफिसमध्ये येईपर्यंत त्याच्या डोक्यावर विचारांचे ओझे असते. पण एकदा का तो आॅफिसमध्ये आला की त्याचा गणवेश घालतो. गणवेश तोच असतो; पण इंटेन्सिटी वेगळी असते अन् व्यक्तीगणिक ती बदलत जाते. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला या सर्व गणवेशांची कहाणी समजेल.