Join us

१८ OTT प्लॅटफॉर्म केंद्र सरकारने केले Blocked! अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 1:13 PM

केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ओटीटीवरील अशा तब्बल १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालून ती ब्लॉक करण्यात आली आहेत. याबरोबरच १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई करण्यात आली आहे. 

कोणतीही बंधने नसल्याने अश्लील कटेंट दाखवणारी अनेक ॲप्स ओटीटीवर सुरू होती. अशा ॲप्सवर आता केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ओटीटीवरील अशा तब्बल १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालून ती ब्लॉक करण्यात आली आहेत. पोर्नोग्राफी आणि अश्लील कंटेट दाखवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रीम्स फिल्म्स, एक्स प्राइम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा यात समावेश आहे. याबरोबरच १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई करण्यात आली आहे. 

"माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी वारंवार अश्लीलता आणि हिंसाचाराला प्रोत्साहन न देण्यावर जोर दिला आहे. १२ मार्च २०२४ रोजी अनुराग ठाकूर यांनी १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी कारवाई केली आहे.  माहिती तंत्रज्ञान अॅक्ट, २००० अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे." असं म्हणण्यात आलं आहे. अनेक वेळा सूचना देऊनही अश्लील कंटेट दाखवल्याने या प्लॅटफॉर्मवर कारवाई केली गेली आहे. 

ब्लॅक करण्यात आलेले १८ OTT प्लॅटफॉर्म

ड्रीम्स फिल्म्स

वूवी

येस्मा

अनकट अड्डा

ट्राई फ्लिक्स

एक्स प्राइम

नियॉन एक्स वीआईपी

बेशरम

शिकारी

खरगोश

एक्स्ट्रामूड

न्यूफ़्लिक्स

मूडएक्स

मोजफ्लिक्स

हॉट शॉट्स वीआईपी

फुगी

चिकूफ़्लिक्स

प्राइम प्ले

याबरोबरेच फेसबुकवरील १२, इन्स्टाग्रामवरील १७, X वरील १६ अकाऊंट आणि युट्यूब वरील १२ चॅनेलवर कारवाई करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :माहिती व प्रसारण मंत्रालय