Join us

दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबाविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 9:00 AM

ऑनस्क्रीन साकारलेल्या भूमिकांपेक्षा दिलिप प्रभावळकर खऱ्या आयुष्यात फार वेगळे आहेत. जितके ते ऑनस्क्रीन उग्र, रागीट व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका केल्या असल्या तरीही माझा स्वभाव नरमच राहिला, अतिशय सौम्य स्वभाव असल्याचे खुद्द दिलीप प्रभावळकर यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर वयाच्या ७७ वर्षीही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह कोणालाही थक्क करेल असाच असतो. आजही आपल्या अभिनयाने दिलीप प्रभावळकर रसिकांचे मनोरंजन करत आहेत. दिलीप प्रभावळकर यांचा गाजलेल्या सिनेमा आजही रसिकांच्या आठवणीत आहे.अनेक अजरामर अभिनय साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  मालिका, सिनेमा, नाटकं या सगळ्या माध्यमातून त्यांनी आपला वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या फिल्मी करिअरविषयी जितकी माहिती त्यांच्या चाहत्यांना आहे तितकी खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.

ऑनस्क्रीन साकारलेल्या भूमिकांपेक्षा दिलिप प्रभावळकर खऱ्या  आयुष्यात फार वेगळे आहेत. जितके ते ऑनस्क्रीन उग्र, रागीट व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका केल्या असल्या तरीही माझा स्वभाव नरमच राहिला, अतिशय सौम्य स्वभाव असल्याचे खुद्द दिलीप प्रभावळकर यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.इतकेच काय तर दिलीप प्रभावळकर अभिनयात येण्यापूर्वी टीसीएफ औषध निर्माती कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. नोकरी करता करता त्याच काळात ते बालरंगभूमीशी जोडले गेले आणि बघता बघता दिलीप प्रभावळकर अभिनेते म्हणून नावारूपाला आले.

दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचे नाव नीला प्रभावळकर आहे. नीला चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून लांबच राहणे पसंत करतात. इतकेच काय तर सोशल मीडियावरही त्यांचे फोटो पाहायला मिळणार नाहीत. नीला आणि दिलीप प्रभावळकर यांना एक मुलगा आहे. केदार प्रभावळकर असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. सिनेसृष्टीत इतके प्रसिद्ध दिलिप प्रभावळकर असूनही केदारने मात्र अभिनयक्षेत्रात न येता दुसरेच क्षेत्र करिअरसाठी निवडले.

 

मुळात केदारला अभिनयाची अजिबात आवड नाही. केदारही कधीच प्रकाशझोतात नसतो. दिलीप प्रभावळकर याच्या कुटुंबाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर समोर येत नाही. केदारलाही प्रकाशझोतात राहणे अजिबात आवडत नाही. या सगळ्या गोष्टींपासून आईप्रमाणे तो ही लांबच राहणे पसंत करतो. १७ डिसेंबर २०१३ साली केदार सोनल अलवारसोबत लग्नबंधनात अडकला. या लग्नाला सिनेसृष्टीतल्या कलाकार मंडळींनी देखील हेजरी लावली होती. केदार आणि सोनल दोघेही इन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट सेंटरशी निगडित आहेत. हे पर्यावरण 

टॅग्स :दिलीप प्रभावळकर