Uorfi Javedच्या चेहऱ्यावर कुणी मारला ठोसा? अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, तिला ओळखणं ही झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:45 PM2023-02-01T16:45:57+5:302023-02-01T16:51:19+5:30
अभिनेत्री उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
Uorfi Javed Photo: सोशल मीडियावर तिच्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेद(Uorfi Javed) च्या बाबतीत काहीतरी ना काही रोज घडतच असते. कधी तिच्या शरीरवर ऍलर्जी होते, कधी ती आजारी पडते तर कधी तिच्या चेहऱ्याची अवस्था बिकट होते. अलीकडेच उर्फी जावेदच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली काळ्या डाग झाला आहे. ही खूण असे दिसते की जणू कोणीतरी त्याला ठोसा मारला आहे. हे आम्ही नव्हे तर उर्फी जावेद स्वतः म्हणतेय.
उर्फी जावेद तिच्या हेल्थ आणि फॅशनशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करते. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती तिच्या चेहऱ्याची एक बाजू दाखवते आहे. फोटोमध्ये तिच्या एका डोळ्याखाली गडद डाग आहे. यासोबत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "असे वाटतेय की कोणीतरी मला वाईट पद्धतीने मारले आहे."
उर्फी जावेदला नेहमीच ऍलर्जी असते. कदाचित त्याची ही परिस्थिती ऍलर्जीमुळे देखील झाली असावी. यापूर्वी उर्फी जावेदला तिच्या शरीरावर ऍलर्जी होती. त्यावेळी कपड्यांमुळे ऍलर्जी झाली असल्याचे तिनं सांगितले होते. जेव्हा ती पूर्ण कपडे घालते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पुरळ उठते. म्हणूनच ती रिवीलिंग ड्रेसेस घालते असे म्हणाली होती.
उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.