Urfi Javed : अरेरे, उर्फी जावेदची ही काय अवस्था...? ॲलर्जीनं अख्खा चेहराच बदलला...!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:31 AM2023-01-24T10:31:58+5:302023-01-24T10:32:37+5:30
होय, उर्फी जावेदने आपला एक ताजा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे...
सोशल मीडिया सेन्सेशन व अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी बरीच चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील शाब्दिक वाद तुम्हाला ठाऊक आहेच. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवर आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पण यामुळे घाबरून माघार घेणार ती उर्फी कुठली. माघार घेण्याऐवजी उर्फीने चित्रा वाघ यांनाच डिवचलं. आता हीच उर्फी वेगळ्या कारणानं चर्चेत आली आहे. होय, तिने आपला एक ताजा फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
फोटोत उर्फीचा चेहरा सुजलेला आहे. त्यामुळे ती अगदीच विचित्र दिसत आहेत. या फोटोला तिने मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. क्या से क्या हो गया..., जेव्हा ॲलर्जी होते... आता मी काेणासारखी दिसतेय? असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
Kya se kya ho Gaya ! When allergies hit
— Uorfi (@uorfi_) January 23, 2023
Who do I resemble right now ? pic.twitter.com/7jEJkcPi9p
मध्यंतरी तिच्या एका ॲलर्जीबद्दल सांगितलं होतं. अंगभर कपडे परिधान केल्यास मला अंगावर पुरळ येतात व त्वचा लाल होते, असं ती म्हणाली होती. शिवाय अंगभर अॅलर्जी झाल्याचे फोटोही शेअर केले होते. आता तिने सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटव्दारे शेअर केला आहे. उर्फीला ही ॲलर्जी कशामुळे झाली, हे कळायला मार्ग नाही.
दरम्यान उर्फीच्या या फोटोवा अनेकांनी कमेंट केली आहे. अनेकांनी या फोटोवरून उर्फीची खिल्ली उडवली आहे. एका युजरने उर्फीची तुलना राखी सावंतशी केली. अंगभर कपडे परिधान केले तर अॅलर्जीच होणार ना..., असं एका युजरने लिहिलं. बाबू, आज कपडो में, मी तर आधी ओळखलंच नाही..., तुझ्या सासूबाईची नजर लागली तुला, असंही युजर्सनी म्हटलं.