Join us

Video : 'लागिरं'फेम निखिल पडलाय भाग्यश्रीच्या प्रेमात?... ही आहे 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 3:21 PM

गेल्याकाही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात 'लागीरं झालं जी' फेम निखील चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नहळवे यांच्यात काहीतरी Something....something.... सुरु असल्याची चर्चा सुरु होती.

गेल्याकाही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात 'लागिरं झालं जी' फेम निखील चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नहळवे यांच्यात काहीतरी Something....something.... सुरु असल्याची चर्चा सुरु होती. म्हणजेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याची कुजबूज सुरु होती. याला कारणही तसंच होतं. पण आता निखिलने दोघांविषयी होणाऱ्या चर्चेचा पूर्णविराम दिला आहे. निखिलच्या अफेअरची चर्चा ऐकून काहींना आनंद तर काहींना दु:खं झालं होतं, पण आता त्याने यावर खुलासा केला म्हटल्यावर सगळंच स्पष्ट झालंय.

निखिल चव्हाण याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. झालं असं होतं की, निखिलने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भाग्यश्री सोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत त्याला Something....something.... something..असं कॅप्शन दिलं होतं. झालं...इथूनच दोघांमध्ये काही असल्याची चर्चा सुरु झाली. पण आता त्याने असं काही नसल्याचं स्पष्ट केलंय. 

निखिल म्हणाला की, ' आम्ही डेटिंग वगैरे काही करत नाही आहोत. पण आमच्यात एक छान बॉन्डींग तयार झाली. एक चांगली मैत्री तयार झाली आहे. त्याचं कारण आम्ही दोघेही पुण्याचे आहोत. इतके जवळचे की, भाग्यश्री सासवडची आणि मी हडपसरचा आहे. बस यापलिकडे आमच्यात काही नाहीये. खरंतर आमची ओळख पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात झाली होती. आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत होतो, पण कधी एकमेकांशी बोललो नव्हतो. पण त्यावेळी आम्ही पहिल्यांदा बोललो'.

भाग्यश्री म्हणाली की, 'मंदिरात झालेल्या भेटीनंतर आम्ही फेसबुक मॅसेंजरवर बोललो आणि हळूहळू मैत्री फुलली. कदाचित देवीच्याच मनात असेल की, आमची मैत्री व्हावी, एकत्र चांगली चांगली कामे मिळत रहावी'. 

आता 'लागिरं झालं जी' मालिकेतून घराघरात आणि तरुणींच्या मनात घर केलेला विकी म्हणजेच निखिलच्या फॅन्समध्ये त्याच्या कथित अफेअरची चर्चा होणारच ना! इतकंच काय तर निखिलच्या अनेक फीमेल फॅन्समध्येही जरा नाराजी होती. पण आता त्याने असं काही नसल्याचा खुसाला केल्यावर नक्कीच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असावा यात दुमत नाही.  

निखिल आणि भाग्यश्री 'शुद्धदेसी मराठी'च्या 'स्त्रीलिंग पुलिंग' या नव्या कोऱ्या-करकरीत वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. या ट्रेलरला जोरदार प्रतिसादही मिळाला. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती वेबसीरिजची. ही वेबसीरिज ३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :स्त्रीलिंग पुल्लिंगवेबसीरिजमराठीभाग्यश्री न्हालवेनिखील चव्हाण