अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओ प्रकरणातील आरोपींपर्यंत दिल्ली पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आयपी अॅड्रेसवरून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याआधी त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहेत. पोलिसांनी मेटाला नोटीस देऊन आरोपींची माहिती मागवली आहे.
मनोज वाजपेयीच्या 'जोराम' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फेक आयडी आणि व्हीपीएनचा वापर करून फेसबुकवर अकाउंट बनवले होते. ते आता आरोपींनी हटवले. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ बनवणारा व्यक्ती अद्याप सापडलेला नाही. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सहकार्य घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारशी बोलताना सर्व प्रकारच्या सहकार्याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात पोलीस तपासात सहकार्य होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आयपी अॅड्रेस हा एक पत्ता आहे याद्वारे इंटरनेट किंवा स्थानिक नेटवर्क ओळखले जाते. पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत, परंतु अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही.
दिल्ली महिला आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्सने ११ नोव्हेंबर रोजी या संदर्भात अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. नुकताच रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यावर बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक स्टार्सनी आक्षेप घेतला होता.
डीप फेक म्हणजे काय?
डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर शक्तिशाली संगणकाचा वापर करून कोणत्याही व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी दुसर्या चेहऱ्यावर सुपरइम्पोज करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही दिवसापूर्वी रश्मिका मंदाना आणि काजोलसह अनेक अभिनेत्रींचे व्हिडीओ समोर आले होते.