Join us

'अ‍ॅनिमल'नंतर उपेंद्र लिमयेंचा नवा बॉलिवूड सिनेमा, राजकुमार रावसोबत केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:15 IST

नुकतंच 'टोस्टर' (Toaster) या सिनेमाचा टीझर समोर आलाय.

Upendra Limaye: बॉलिवूडमध्येही असे अनेक मराठी कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरदार वेगळं स्थान निर्माण केलंय. असाच वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून सगळ्यांना पुरून उरणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये (Upendra Limye).  अतिशय प्रतिभावान अभिनेता म्हणून उपेंद्र लिमयेला ओळखलं जातं. त्याची स्टाईल, भाषा, आवाज सगळंच प्रेक्षकांना भिडतं. आता 'अ‍ॅनिमल' या बॉलिवूड सिनेमाच्या यशानंतर उपेंद्र लिमये यांचा नवा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात उपेंद्र लिमयेची छोटी पण दमदार 'फ्रेडी' नावाची भूमिका पाहायला मिळाली होती. या भूमिकेसाठी त्याचं सर्वत्र भरपूर कौतुक झाले. याआधी उपेंद्र सलमान खानच्या 'अंतिम' आणि अमिताभ बच्चनच्या 'सरकार राज' या सिनेमातसुद्धा दिसला होता. पण, 'अ‍ॅनिमल' सिनेमानंतर त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली तर आहेच, पण यासोबत अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. 

आता नुकतंच 'टोस्टर' (Toaster) या सिनेमाचा टीझर समोर आलाय. सुपरस्टार राजकुमार (Rajkummar Rao) यात मुख्य भुमिकेत आहे. या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात उपेंद्र लिमये दिसणार आहे.  'टोस्टर' चित्रपटासाठी उपेंद्र यांच्या कास्टिंगबद्दल राजकुमार राव म्हणाला, "मी त्यांना कॉल केला. तेव्हा अशाच प्रकारच्या तीन चार भुमिकांची ऑफर आलेली असून याबद्दल विचार करतो. पण, मला तु खरचं खूप आवडतो असं ते म्हणाले. मग त्यांना म्हटलं आय लव्ह यू सर, तुम्ही हो म्हणा सर. खूप मजा येईल आणि मग त्यांनी मोठ्या मनाने होकार दिला. 

उपेंद्र लिमये म्हणाला, मी राजकुमार रावच्या कामाचा मोठा चाहता आहे. तर त्यांच्यासोबत एक चांगली कथा असलेला, चांगल्या दिग्दर्शकासोबत, चांगल्या प्रोडक्शन हाऊससोबत, एका चांगल्या टीमसोबत काम करू अशी ईच्छा होती आणि हे सर्व एकाच चित्रपटाच्या माध्यमातून पुर्ण झालं.  सिनेमा करताना आम्हाला खूप मस्ती केली. आता प्रेक्षकांनाही सिनेमा पाहताना खूप मजा येईल, असं ते म्हणाले.

टॅग्स :उपेंद्र लिमये राजकुमार रावसान्या मल्होत्रानेटफ्लिक्स