Join us

उर्दूमुळे तापसीला मिळाला बेबी

By admin | Published: December 05, 2014 11:24 PM

अभिनेत्री तापसी पन्नू दक्षिण भारतीय चित्रपटांत काम करीत असली, तरी तिला उर्दू भाषेचे चांगले ज्ञान आहे

अभिनेत्री तापसी पन्नू दक्षिण भारतीय चित्रपटांत काम करीत असली, तरी तिला उर्दू भाषेचे चांगले ज्ञान आहे. तिच्या या कौैशल्यांमुळेच अक्षय कुमारसोबत बेबी या चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली आहे. तापसीने चश्मेबद्दूर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, हा चित्रपट यशस्वी ठरला; पण त्याचा फारसा फायदा तापसीच्या बॉलीवूड करिअरसाठी झाला नाही. बेबीकडून तापसीला खूप अपेक्षा आहेत. बेबी चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे करीत आहेत.