Join us

उर्फी जावेदने इरफान खानच्या मुलासाठी वाजवल्या टाळ्या, बाबिलने सरळ केलं दुर्लक्ष; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 11:53 IST

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Urfi Javed : बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर जोडी अबु जानी-संदीप खोसला (Abu Jani-Sandeep Khosla) यांच्या 'मेरा नूर है मशहूर' या लेटेस्ट फॅशन फिल्मचे प्रिमियर झाले. यासाठी 'जया बच्चन', 'श्वेता बच्चन नंदा', 'नीतू कपूर' , 'राधिका मर्चंट' यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदही (Urfi Javed) आपली विचित्र फॅशन करत पोहोचली. तेव्हा उर्फीने असे काही केले की इरफान खानच्या मुलाने तिच्याकडे थेट दुर्लक्षच केले.

अबू जानी-संदीप खोसला यांच्या फिल्म लॉंचसाठी उर्फी जावेद लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये पोहोचली. ट्रान्सपरंट ब्लाऊजसह तिने लाल रंगाची साडी नेसली होती. तर तिने डोक्यावर सोनोरी रंगाचा एक मुकुटही लावला होता. उर्फीची फॅशन नेहमीप्रमाणेच विचित्र दिसत होती. यावेळी तिने पापाराझींसोबत गप्पाही मारल्या. नंतर ती तिथून निघत असतानात इरफान खानचा मुलगा बाबिल खानची (Babil Khan) एंट्री झाली. बाबिलने यावेळी रंगीबेरंगी ड्रेस परिधान केला होता तर त्यावर काळ्या रंगाचा कोट घातला होता. बाबिल तिथे येताच उर्फी जावेद पापाराझींना म्हणते तिकडे बघा कॅमेरा तिकडे करा. आणि ती बाबिलसाठी जोरजोरात टाळ्याही वाजवते. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. उर्फी बाबिलसाठी टाळ्या वाजवताना दिसते तर बाबिल मात्र तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तो तिला भावही देत नाही. यावरुन ती फार ट्रोलही होत आहे. तर बाबिलही त्याच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होत आहे. 'मुलींसारखे कपडे का घातले आहेत' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत. 

मात्र यानंतर एक असाही फोटो आला ज्यामध्ये बाबिल खान आणि उर्फी हात मिळवत आहेत. त्यामुळे बाबिलने तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं वाटत नाही. तरी कालच्या या पार्टीत दोघेही चांगलेच ट्रोल झालेत.

टॅग्स :उर्फी जावेदइरफान खानसोशल मीडियाट्रोल