Urfi Javed : 'आजोबा' जावेद अख्तर यांना भेटून उर्फी म्हणते, आता प्रॉपर्टीचे तीन हिस्से होतील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:32 AM2023-01-09T10:32:30+5:302023-01-09T10:34:25+5:30
आपल्या अजब गजब कपड्यांनी लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने नुकतीच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची भेट घेतली
Urfi Javed : आपल्या अजब गजब कपड्यांनी लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने नुकतीच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो तिने स्वत:सोशल मीडियावर पोस्ट केला जो तुफान व्हायकल झाला. मात्र तिने फोटोला जे कॅप्शन दिले ते भतलेच चर्चेत आले होते. तिने जावेद अख्तर यांचा आजोबा असा उल्लेख केला आहे हे बघून नेटकऱ्यांना काही हसू आवरले नाही. आता तिचं आणखी एक विधान व्हायरल होताना दिसत आहे ते कोणते बघा.
पापाराझींनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ मध्ये उर्फी जावेदचा व्हिडिओ आहे. यामध्ये उर्फी चक्क गुलाबी रंगाच्या पारंपारिक ड्रेस मध्ये दिसत आहे. मात्र यातही तिने तिची फॅशन दाखवलीच आहे. हा ड्रेस बॅकलेस दिसतोय जे बघून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
जावेद अख्तर यांच्या संपत्तीत मागितला वाटा
उर्फी जावेद तिच्या कामासाठी दिल्लीत होती. ती ज्या विमानात होती त्याच फ्लाईटमध्ये जावेद अख्तर देखील प्रवास करत होते. इथेच तिची त्यांच्याशी भेट झाली. तिथून येताना विमानतळावर उर्फीला फोटोग्राफर्सने घेरले. तेव्हा फोटोग्राफर्सने जावेद अख्तर यांच्या भेटीविषयी विचारले. यावर उर्फी म्हणाली, 'ते खूप चांगले आहेत. आम्ही एकाच फ्लाईटमध्ये होतो. तुम्हाला माहितीए का मी त्यांची नात आहे. आता त्यांच्या संपत्तीचे तीन हिस्से होतील.
विमानतळावर येण्यापूर्वी उर्फीने जावेद अख्तर यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला होता. त्यात तिने लिहिले होते, 'अखेर आजोबांशी भेट झाली. ते मनाने खूपच चांगले आहेत. सकाळी सकाळी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आणि त्यांनी सुद्धा हसत हसत सर्वांशी गप्पा मारल्या. ते खूपच चांगले आहेत आणि मी थोडी घाबरलेले होते.'
सध्या उर्फीने राजकारण्यांशीही पंगा घेतला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला बेड्या ठोका असे म्हणले होते. यावर उर्फीनेही त्यांना उलट प्रतिक्रिया दिली होती. तेव्हापासून दोघींमध्ये वाद सुरु झाला आहे. उर्फीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे मात्र तिच्यावर खरंच काही कारवाई होणार का हा प्रश्नच आहे.