Join us

शाहरुखच्या नावाखाली उर्फीने सगळ्यांना गंडवलं! व्हायरल सेल्फीमागचं सत्य नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 19:35 IST

विविध फॅशन करुन सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या उर्फीने शाहरुख खानसोबत फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला

विविध अतरंगी फॅशनमुळे लोकांमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. कधी उर्फी तिच्या ड्रेसमध्ये संपूर्ण ब्रम्हांड सामावते तर कधी लहान मुलांची खेळणी. कधी गवत, कधी सुतळ दोरी अशा विविध वस्तूंचा वापर करत उर्फी फॅशनच्या दुनियेत प्रसिद्ध आहे. आज उर्फी मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. उर्फीने शाहरुख खानसोबत फोटो पोस्ट केला. पण यामुळे उर्फीने सगळ्यांना गंडवलं अशा नेटकऱ्यांच्या भावना आहेत.

झालं असं की, उर्फीचा आज सकाळी किंग खान अर्थात शाहरुखसोबतचा सेल्फी व्हायरल झाला. त्यामुळे सुरुवातीला उर्फीची खुप चर्चा झाली पण थोड्या वेळाने हा सेल्फी फेक आहे हे सर्वांच्या लक्षात आलं. उर्फीने एका अॅपचा वापर केला आहे. यात शाहरुखचा चेहरा फिल्टर असून कोणीही त्याच्यासोबत सेल्फी घेऊ शकतो असा भास निर्माण करता येतो. लोकांच्या हे लक्षात येताच अनेकांनी उर्फीवर नाराजी व्यक्त केलीय. 

काही लोकांना मात्र उर्फीचा हा फोटो खरा वाटत आहे. आता सत्य काय? हे उर्फीलाच ठाऊक. उर्फी लवकरच 'LSD 2' सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. याशिवाय प्राईम व्हिडीओच्या आगामी प्रोजेक्टमध्ये उर्फी झळकणार आहे. अशाप्रकारे फॅशनने लोकांचं मनोरंजन करणारी उर्फी आता अभिनयातून लोकांचं मन कसं जिंकणार, हे थोड्याच दिवसांत लक्षात येईल.

टॅग्स :शाहरुख खानउर्फी जावेदसेल्फी