Join us

लय भारी ! उर्मिला कोठारे असा शिकतेय छोट्या जिजाला डान्स, माय-लेकीचा क्युट व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:52 IST

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्री  उर्मिला कोठारेने खूपच कमी वयापासून नृत्य शिकायला सुरुवात केली असून ती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली नर्तिका आहे. अभिनयासोबतच तिच्या डान्स व्हिडिओमुळे ही ती सोशल मीडियावर तितकीच चर्चेत असते.. उर्मिलाला डान्सची आवड आहे. त्यामुळे ती आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर आपले हटके डान्स व्हिडिओ पोस्ट करत असते. त्यातील तिच्या अदांवर सगळेच फिदा होतात.आता उर्मिलाने छोट्या जिजाला ही डान्सचे धडे द्यायला सुरुवात केलीये. नुकताच  उर्मिलाने छोट्या  जिजाला डान्स शिकवताना एक व्हिडिओ पोस्ट केलाये.. ज्यात जिजा आपल्या आईच्या डान्स स्टेप फॉलो करताना दिसतेय..सोबतच या व्हिडिओतील जिजाचा क्यूट अंदाज सगळ्यांच लक्षवेधून घेतोय .

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. उर्मिलाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे सोबत झाले आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची ही जोडी खूपच आवडते. 

टॅग्स :उर्मिला कानेटकर कोठारेआदिनाथ कोठारे